पिंपळगाव चांभारे येथे जिल्हा पशुधन अधिकाऱ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:18 IST2021-01-22T04:18:06+5:302021-01-22T04:18:06+5:30

निहिदा : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळगाव चांभारे येथील रमेश सुरडकर यांच्या मालकीच्या ७० कोंबड्यांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस ...

Visit of District Livestock Officer at Pimpalgaon Chambhare | पिंपळगाव चांभारे येथे जिल्हा पशुधन अधिकाऱ्यांची भेट

पिंपळगाव चांभारे येथे जिल्हा पशुधन अधिकाऱ्यांची भेट

निहिदा : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळगाव चांभारे येथील रमेश सुरडकर यांच्या मालकीच्या ७० कोंबड्यांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यामुळे परिसरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती निर्माण होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत गुरुवार, दिनांक २१ जानेवारी रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाला जाग येऊन गुरुवारी दुपारी पिंपळगाव चांभारे येथे अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी मृत कोंबड्यांची पाहणी करण्यात आली.

पिंपळगाव चांभारे येथे पशुधन विभागाचे उपायुक्त बावणे, जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. गजानन दळवी यांनी भेट देऊन मृत कोंबड्यांबाबत चौकशी केली. पशुधन अधिकाऱ्यांनी कोंबड्यांचा मृत्यू हा ‘बर्ड फ्लू’ आजाराने झाला नसून, राणीखेत नावाच्या आजाराने झाल्याचा संशय व्यक्त केला. मृत कोंबड्या शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवार, २१ जानेवारी रोजीसुद्धा रामराव सुरडकर यांच्या मालकीच्या ८ ते १० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पिंपळगाव चांभारेचे सरपंच भारत पाटील चांभारे यांनी दिली. गावात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आहे. त्यामुळे या आजारावर त्वरित इलाज करून मार्गदर्शन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. भेटीदरम्यान, जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. गजानन दळवी, डॉ. रणजित गोळे, पिंजरचे बी. बी. करवते, आर. डी. राठोड यांची उपस्थिती होती. (फोटो)

Web Title: Visit of District Livestock Officer at Pimpalgaon Chambhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.