इको फ्रेन्डली गणेशोत्सवासाठी वनविभागाचे ‘व्हिजन-२0१५’

By Admin | Updated: September 11, 2014 01:26 IST2014-09-11T01:26:51+5:302014-09-11T01:26:51+5:30

हरित सेनेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग : चित्रफीत दाखवून करणार जनजागृती

'Vision-2011' of forest department for eco-friendly Ganeshotsav | इको फ्रेन्डली गणेशोत्सवासाठी वनविभागाचे ‘व्हिजन-२0१५’

इको फ्रेन्डली गणेशोत्सवासाठी वनविभागाचे ‘व्हिजन-२0१५’

विवेक चांदूरकर / अकोला
पर्यावरपूरक गणेशोत्सवासाठी सामाजिक वनीकरण विभागाने पुढाकार घेतला आहे. गणेशोत्सव राज्यभर नुकताच साजरा झाला. या उत्सवात प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचा वापर आणि निर्माल्यामुळे जलप्रदुषणासोबतच, पर्यावरणाची हानी झाली आहे. पुढच्या वर्षी गणेशोत्सवात हा प्रकार होऊ नये, यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने ह्यव्हिजन-२0१५ह्ण कार्यक्रम आखला आहे.
अकोला सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ह्यव्हिजन-२0१५ह्ण हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. जिल्हय़ात २५0 शाळांमध्ये राष्ट्रीय हरित सेना कार्यरत आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांकडून कार्यानुभव विषयांतर्गत शाडू मातीच्या गणेशाच्या मूर्त्या बनवून घेण्यात येणार आहेत. याकरिता पहिल्या टप्प्यात दहा शाळांची निवड करण्यात येणार असून, त्या शाळांना मूर्ती बनविण्याचा साचा देण्यात येणार आहे. जिल्हय़ातील २५0 शाळांमधील विद्यार्थ्यांकडून २५ हजार गणेश मूर्त्या बनविण्यात येणार आहे. अशा प्रकारे एक लाख मूर्त्या बनविण्याचा संकल्प वन विभागाने केला आला आहे. शाडू मातीच्या या मूर्त्यांची स्थापना विद्यार्थी त्यांच्या घरी करतील. उर्वरित मूर्त्यांची विक्री बाजारपेठेत करण्यात येईल.

Web Title: 'Vision-2011' of forest department for eco-friendly Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.