काळ्या कीटकांचे पर्‍हाटीवर आक्रमण

By Admin | Updated: August 3, 2014 00:27 IST2014-08-03T00:27:28+5:302014-08-03T00:27:28+5:30

शेतात काळय़ा रंगाच्या कीटकाचा प्रहार होत आहे.

Violet attack of black worms | काळ्या कीटकांचे पर्‍हाटीवर आक्रमण

काळ्या कीटकांचे पर्‍हाटीवर आक्रमण

रोहणखेड : आकोट तालुक्यातील खारपाणपट्टय़ातील रोहणखेड परिसरातील खरीप हंगामातील पर्‍हाटी, तूर, उडीद या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या कोवळ्या पिकांवर शेतात काळय़ा रंगाच्या कीटकाचा प्रहार होत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. कोवळे पीक डोळ्यादेखत नष्ट होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या नवीन संकटामुळे रोहणखेड परिसरात सुनील रमेश झामरे, बाळू शालीकराम झामरे, बबनराव झामरे, ब्रिजलाल वानखडे, सरपंच रंजीत झामरे, नीळकंठ झामरे, नंदू दाने, संजय झामरे, गौतम इंगळे, भुजिंग झामरे, गजानन झामरे, सुभाष झामरे, अनिल तोताराम झामरे यांच्या शेतीतील कोवळी झाडे पूर्णपणे नष्ट केले. त्यामुळे रोहणखेड परिसरात या काळ्या कीटकाने पर्‍हाटीचा घात केल्याने संपूर्ण शेतात शेतकर्‍यांनी दुबार पेरणीला सुरुवात केली आहे. आधीच शेतकर्‍यांनी खरिपाची पेरणी दीड महिना उशिरा केली. त्यात मृग नक्षत्र पूर्ण कोरडे गेले. त्यात आशा होती शेतकर्‍यांना खरिप हंगामाची. त्यातही निसर्गाची वक्रदृष्टी व अतवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांनी पेरलेले बियाणे निघालेच नाही. पुराने नाल्याकाठची जमीन खरडून गेली. शेतकर्‍यांची उरलीसुरली आशाही मावळली असून, वर्षभर कुटुंबाचा गाडा ओढायचा कसा,अशी चिंता शेतकर्‍यांना पडली आहे. तसेच मागील वर्षी शेतकर्‍यांनी हरभरा पेरला होता. त्याच शेतात ज्या शेतकर्‍यांनी पर्‍हाटीची पेरणी केली त्याच शेतातील यावर्षी मात्र बोटभर उंच असलेल्या या पिकावर काळ्या कीटकाने सातत्याने आक्रमण केल्याने हे काळेभोर कीटक पर्‍हाटीचे रोपटे कापल्यासारखे खाल्ल्या जात आहे. त्यामुळे पर्‍हाटीचे झाड नष्ट होत असल्याचे दिसून येत आहे. या संकटावर उपाययोजनेसाठी कृषी विभागातील कर्मचार्‍यांनी पर्‍हाटी उत्पादकाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. या नवीन संकटामुळे कपाशीच्या उत्पादनातही घट होणार आहे.

Web Title: Violet attack of black worms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.