Violation of rules; fine of Rs. 26,000 recovered | नियमांचे उल्लंघन;२६ हजाराचा दंड वसूल

नियमांचे उल्लंघन;२६ हजाराचा दंड वसूल

अकाेला: शहरात जीवघेण्या काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. साेशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचा नागरिकांना विसर पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ मंगळवारी मनपाने गठित केलेल्या पथकांनी मास्क न लावणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांजवळून २६ हजार रुपयांचा दंड वसूल केला़

संसर्गजन्य काेराेनामुळे बाधित हाेणाऱ्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याची परिस्थिती आहे़ अशावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन मनपाकडून सातत्याने केले जात आहे़ बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी फिरणाऱ्या व ताेंडाला मास्क न लावणाऱ्या नागरिकांविराेधात मनपाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ताेंडाला मास्क न लावणाऱ्या ३० नागरिकांजवळून दाेन हजार रुपये व साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १७ व्यावसायिक प्रतिष्ठानकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला़

Web Title: Violation of rules; fine of Rs. 26,000 recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.