नियमांचे उल्लंघन, पातुरात १७ दुकानदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:19 IST2021-05-09T04:19:47+5:302021-05-09T04:19:47+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना दुकाने बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार शहरातील जीरा ...

नियमांचे उल्लंघन, पातुरात १७ दुकानदारांवर कारवाई
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना दुकाने बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार शहरातील जीरा चौक, गुरुवार पेठ, गुजरी लाईन, कानबाई चौक, काजीपुरा, मुजावरपुरा या भागातील दुकानदारांना परवानगी नसताना दुकान उघडे असल्याचे दिसून आले. त्यामुळे मुख्याधिकारी सोनाली यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख आशीष भगत, अभियंता ऐनोद्दीन फयाजोद्दीन, सय्यद जावेद सय्यद जहीर, सय्यद सादिक सय्यद सादूच्या पथकाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली. त्या अनुषंगाने दुकानदारांविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या दुकानांवर झाली कारवाई
अक्षय ड्रेसेस, जय भोले मोबाईल, सिक्युरिटी सिस्टम, महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स व म्युझिक सेंटर, सायकल शाॅप, विश्वकर्मा वेल्डिंग वर्कशॉप, भवानी साडी सेंटर, परफेक्ट झेरॉक्स सेंटर, शिफा कलेक्शन सेल, डायमंड ज्वेलरी, बॅग, महाराष्ट्र बिछायत केंद्र, तवक्कल कटपीस सेंटर, तैबह ड्रेस मटेरियल, अपूर्वा ब्युटी पार्लर, साडी व ड्रेस मटेरियल, हरिहर जगदंब ज्वेलर्स, अष्टविनायक आर्ट, गायत्री लेडीज टेलर आणि आरजू पान सेंटर या दुकानांवर कारवाई करण्यात आली.