आचारसंहितेचा भंग केल्याने सहा उमेदवारांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: October 10, 2014 00:13 IST2014-10-10T00:13:28+5:302014-10-10T00:13:28+5:30
जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील सहा उमेदवारांसह वैद्यकीय अधीक्षकावर गुन्हा दाखल.

आचारसंहितेचा भंग केल्याने सहा उमेदवारांविरुद्ध गुन्हा
संग्रामपूर (बुलडाणा) : आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जळगाव जा. विधानसभा मतदारसंघातील सहा उमेदवारांसह वैद्यकीय अधीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव जा. मतदार संघातील उमेदवार संतोष आनंदराव घाटोळ शिवसेना, प्रसेनजित किसन तायडे भारिप-बमसं, प्रकाश तुळशीराम ढोकणे राष्ट्रवादी, संजय श्रीराम कुटे भाजपा, रामविजय ज्ञानेश्वर बुरुंगले काँग्रेस, गजानन नामदेव वाघ मनसे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांची पूर्वपरवानगी न घेता तसेच वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल यांनी २00 मीटरचे आत प्रचार कार्यालय थाटण्यास नाहरकत प्रमाणपत्र दिले. याबाबत भाऊ भोजने यांनी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने नायब तहसीलदार प्रल्हाद दाभाडे यांनी पाहणी करुन अहवाल सादर केला होता. त्यानंतर उपरोक्त उमेदवार तसेच वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याविरुद्ध कलम १८८ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.