‘वॉटर कप’च्या श्रमदानासाठी गावकर्यांचा अनोखा उपक्रम
By Admin | Updated: March 30, 2017 14:10 IST2017-03-30T14:10:34+5:302017-03-30T14:10:34+5:30
पाणी फाउंडेशनच्या सदस्यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन श्रमदानाचे महत्व पटवून दिले.

‘वॉटर कप’च्या श्रमदानासाठी गावकर्यांचा अनोखा उपक्रम
बेलूरा खुर्द (अकोला): पातुर तालुक्यातील बेलुरा खुर्द येथे पाणी फाउंडेशन उपक्रमाअंतर्गत गुरुवारी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ यांनी पाणी फाऊडेशन ह्यवाटर कपह्ण स्पर्धे संदर्भात जनजागृती करण्याकरीता अनोखे आंदोलन केले. पाणी फाउंडेशनच्या सदस्यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन श्रमदानाचे महत्व पटवून दिले. येत्या ८ एप्रिल पासून पाणी फाउंडेशनच्या कामास सुरुवात येणार आहे पण गावातून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिसत नाही. त्या मुळे प्रशिक्षणार्थ्यांनी गावात फिरून श्रमदानासाठी भिक मागण्याचा निर्णय घेतला.सदर कामास जि. प. प्रा.शाळेचे विद्यार्थी मुख्याध्यापक मुलचंद चव्हाण , रमेश खराटे , सुरेश ठाकरे, गणेश उमाडे , गजानन लोखंडे, संदीप देऊळगावकर , प्रशिक्षणाथर्ी :-- प्रमिलाताई देशमुख , वनिता दांदळे , शशिकांत डांगे, नागेश साबे, योगेश इंगळे, रामदास लोखंडे , राजेंद्र देशमुख ,विश्वासराव देशमुख ,प्रदीप देशमुख , श्रीकांत डांगे , पुंडलिक डांगे, कुलदीप देशमुख ,निलेश तायडे ,गोपाल तायडे , प्रदीप काळे, पुरुषोत्तम साबे, विजय इंगळे ,दीपक तायडे, अमोल देशमुख , कैलास इंगळे , मंगलाताई लोखंडे , चीत्राबाई देशमुख , सुनिता देशमुख ,इत्यादी मंडळीनी श्रमदानासाठी सहभागी होण्याची शपथ घेतली.