उमऱ्याच्या ग्रामस्थांनी खोदले १४६१ घनमीटर क्षमतेचे शेततळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2017 19:38 IST2017-05-03T19:38:32+5:302017-05-03T19:38:32+5:30
पातूर : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत पातूर तालुक्यातील उमरा येथे गावकऱ्यांनी लोकसहभागातून १४६१ घनमीटर शेततळे खोदले. यामुळे पाणीटंचाई दूर होणार आहे.

उमऱ्याच्या ग्रामस्थांनी खोदले १४६१ घनमीटर क्षमतेचे शेततळे
पातूर : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेंतर्गत पातूर तालुक्यातील उमरा येथे गावकऱ्यांनी लोकसहभागातून १४६१ घनमीटर शेततळे खोदले. यामुळे गाव परिसरात सिंचन वाढून गावाला पाण्याची टंचाई जाणवणार नाही.
या शेततळ्याची पाणी साठवण क्षमता १४ लाख ६१ हजार लीटर आहे. जवळपास या शेततळ्याच्या माध्यमातून १ कोटी ४० लाख लीटर पाणी भूगर्भात मुरण्याचे कार्य होईल. गाव शेततळ्याच्या निर्मितीबद्दल गावकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. १ मे रोजी गोंधळवाडी गावात गावकऱ्यांनी श्रमदान केले. या श्रमदानात २०० महिला, पुरुष, आबालवृद्ध सहभागी झाले होते. सर्वप्रथम गावातून गावकऱ्यांनी कुदळी, फावडे, टोपले घेऊन प्रभातफेरी काढली. सर्वजण गावकरी महाश्रमदानाला जाण्यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गावकरी शिस्तीने वेगवेगळे गट करून श्रमदानास गेले. ‘आमची स्पर्धा कोणाशी नसून, आम्ही दुष्काळाशी दोन हात करून दुष्काळावर विजय संपादन करू’, असा ध्यास धरून ग्रामस्थ श्रमदान करीत आहेत.