विकसित भारत संकल्प यात्रेचा अकोल्यात शुभारंभ
By आशीष गावंडे | Updated: January 3, 2024 13:44 IST2024-01-03T13:43:27+5:302024-01-03T13:44:22+5:30
भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी दाखवली हिरवी झेंडी.

विकसित भारत संकल्प यात्रेचा अकोल्यात शुभारंभ
आशिष गावंडे, अकोला: शासनाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी देशभर 'विकसित भारत संकल्प यात्रा' काढण्यात येत आहे. ३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अकोल्यातही बुधवारी सकाळी या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांनी यात्रेला हिरवी झेंडी दाखवली. याप्रसंगी विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
महानगरपालिकेच्या आवारात पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अजित कुंभार, महानगरपालिका आयुक्त कविता द्विवेदी यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरपालिका क्षेत्रात येत्या ११ जानेवारी पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.