महावितरणचा वीजपुरवठय़ाचा विक्रम
By Admin | Updated: October 17, 2014 01:06 IST2014-10-17T01:06:03+5:302014-10-17T01:06:03+5:30
महावितरणने तब्बल ३७0.९८ दशलक्ष युनिट वीज पुरवठा केला.

महावितरणचा वीजपुरवठय़ाचा विक्रम
अकोला : महावितरणने १४ ऑक्टोबर रोजी तब्बल ३७0.९८ दशलक्ष युनिट वीज पुरवून पुन्हा नवीन विक्रम नोंदविला आहे.
५ ऑक्टोबरला ३६४.५७ दशलक्ष युनिट अशी विक्रमी वीज पुरविण्यात आली होती. वीज पुरवठय़ाचा हा विक्रम महावितरणने मंगळवारी ओलांडला. महावितरणने १७,२00 मेगावॉट वीज पुरवली असून, विजेची मागणी १७,५७३ मेगावॉट एवढी होती. १ ऑक्टोबरपासून महावितरण सातत्याने १६ हजार मेगावॉटपेक्षा जास्त विजेचा पुरवठा करीत आहे.