अकोला मार्गे विजयवाडा-जयपूर एकेरी विशेष रेल्वे गुरुवारी धावणार
By Atul.jaiswal | Updated: December 12, 2023 11:57 IST2023-12-12T11:56:13+5:302023-12-12T11:57:00+5:30
विजयवाडा ते जयपूर या विशेष रेल्वेचे सिकंदराबाद ते जयपूर पर्यंतचे वेळापत्रक हैदराबाद-जयपुर साप्ताहिक एक्स्प्रेस प्रमाणे आहे.

अकोला मार्गे विजयवाडा-जयपूर एकेरी विशेष रेल्वे गुरुवारी धावणार
अकोला : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वेने विजयवाडा ते जयपूर अशी एकेरी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. अकोला मार्गे धावणार असलेली ही रेल्वे गुरुवार, १४ डिसेंबर रोजी सोडण्यात येणार असल्याने अकोलेरांची सोय होणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०७५९७ विजयवाडा-जयपूर एकेरी विशेष रेल्वे गुरुवार, १४ डिसेंबर रोजी विजयवाडा येथून १४.०५ वाजता सुटेल व दिनांक १६.१२.२०२३ रोजी जयपूरला ०५.२५ वाजता पोहचेल. मार्गात ही विशेष गाडी गुंटूर, सत्तेनापल्ली, पिदुगुरल्ला, नाडीकुडे, मिर्यालागुडा, नलगोंडा, सिकंदराबाद, कामरेड्डी, निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, भोपाळ, रतलाम, मंदसोर, निमच, चित्तौड़गड, भिलवाडा, बिजाईनगर, अजमेर, किशनगड आणि फुलेरा स्टेशनवर थांबेल. या विशेष रेल्वेला एसी ३ टियर इकॉनॉमी, स्लीपर क्लास आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. विजयवाडा ते जयपूर या विशेष रेल्वेचे सिकंदराबाद ते जयपूर पर्यंतचे वेळापत्रक हैदराबाद-जयपुर साप्ताहिक एक्स्प्रेस प्रमाणे आहे.