शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विजय तेलंग स्मृती आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा : अकोला संघाचा सहा गडी राखून विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 11:08 IST

अकोला: विजय तेलंग स्मृती आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील दहावा सामना वर्धा व अकोला जिल्हा संघात शुक्रवारी खेळविण्यात आला. यामध्ये अकोला संघाने सहा गडी राखून दणदणीत विजय मिळविला.

अकोला: विजय तेलंग स्मृती आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील दहावा सामना वर्धा व अकोला जिल्हा संघात शुक्रवारी खेळविण्यात आला. यामध्ये अकोला संघाने सहा गडी राखून दणदणीत विजय मिळविला.वर्धा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीची जोडी वेदांत बाहे आणि अक्षय रामटेके यांनी भोपळाही फोडला नाही. झटपट तंबूत परतल्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या कपिल खांदाते याने सुंदर खेळप्रदर्शन करीत ४६ धावा उभारल्या. त्याला साथ देणाºया अमृत यादव १९ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या नितेश चव्हाण याने उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन करीत अर्धशतक ठोकले. नितेशने नाबाद ५७ धावा काढल्या. पवन चांभारे याने १३, हर्षल पेठे याने १२ आणि पवित्र ढोले याने ५ धावा काढल्या. करण सुकळकर, ऋषी सापकाळ, राज चौहान शून्यावर बाद झाले. अकोला संघाकडून अक्षय शर्मा याने १० षटकात ४४ धावा देत ५ गडी बाद केले. समीर डोईफोडे याने ४ बाद केले. समीर शेख याला १ गडी बाद करता आला.प्रत्युत्तरात अकोला संघाने ३८ षटकात ५ बाद १७० धावा काढून सामन्यावर विजय मिळविला. सलामीला उतरलेल्या आर्यन मेश्रामने दमदार सुरुवात करीत ४७ धावा काढल्या. कृष्णा टापरे ९ धावेवर बाद झाला. वेदांत मुळे याने उत्तम खेळ करू न नाबाद ६६ धावा काढून सामना अकोल्याकडे झुकविला. साकेत दुतोंडे याने ३३ धावांचे योगदान दिले. अक्षय राऊत नाबाद ३ धावा केल्या. मयूर बढेला भोपळा फोडता आला नाही. वर्धा संघाकडून करण सुकळकर याने २ गडी बाद केले. पवन चांभारे, अमृत यादव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Cricket Clubअकोला क्रिकेट क्लब