रवी ठाकूर खेळणार विजय हजारे ट्रॉफी
By Admin | Updated: October 31, 2014 00:33 IST2014-10-31T00:15:14+5:302014-10-31T00:33:13+5:30
अकोला क्रिकेट क्लबचा डावखुरा रवी ठाकूर याची विदर्भ रणजी ट्रॉफी क्रिकेट संघात निवड.
रवी ठाकूर खेळणार विजय हजारे ट्रॉफी
अकोला: अकोला क्रिकेट क्लबचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी ठाकूर याची बीसीसीआय अंतर्गत मध्य विभागामध्ये खेळण्यात येणार्या एक दिवसीय विजय हजारे ट्रॉफीकरिता विदर्भ रणजी ट्रॉफी क्रिकेट संघात निवड झाली आहे. ७ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत जामठा (व्हीसीए) येथे राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, भारतीय रेल्वे व विदर्भ संघात एक दिवसीय सामने खेळण्यात येणार आहेत. यामध्ये अकोल्याचा रवी विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. रवी हा अकोला पोलिस विभागात कार्यरत असून, सीजन-२0१२ पासून चार दिवसीय रणजी व एक दिवसीय रणजी ट्रॉफीकरिता तो विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. विदर्भ संघाकडून खेळताना त्याने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले असल्याचे विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी सांगितले. रवी ठाकूर याचे जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रशेखर मीणा तसेच अकोला क्रिकेट क्लबच्या पदाधिकार्यांनी कौतुक केले.