बेवारस दुचाकीचा वाहतूक शाखेच्या सतर्कतेने शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:14 IST2021-07-11T04:14:54+5:302021-07-11T04:14:54+5:30
शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सचिन दवंडे हे ड्यूटी संपवून घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या ...

बेवारस दुचाकीचा वाहतूक शाखेच्या सतर्कतेने शोध
शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सचिन दवंडे हे ड्यूटी संपवून घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या मागील रोडवर अंधारात दुचाकी बेवारस असल्याचे दिसले़ त्यांना ही बाब संशयास्पद वाटल्याने त्यांनी दुचाकीचे निरीक्षण केले असता, दुचाकी विनालाॅक करताच बेवारसपणे समाेर आली. या दुचाकीची त्यांनी आजूबाजूला चाैकशी केली असता, दाेन दिवसांपासून ही दुचाकी याच ठिकाणी असल्याची माहिती मिळाली़ ही माहिती पाेलीस अंमलदाराने शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांना देऊन दुचाकी वाहतूक शाखेत ठेवून मालकाचा शाेध सुरू करण्यात आला़
यादरम्यान ही दुचाकी अंकिता मधुकर तायडे (रा. गीता नगर, अकोला) यांची असल्याचे समाेर आले़ मात्र, या युवतीचे लग्न झाले असून, या युवतीला लग्नाआधी दुचाकी घेऊन दिली हाेती़ मात्र, तिच्या भावाला बहिणीची दुचाकी चालवू देत नसल्याचा राग असल्याने त्यानेच ही दुचाकी घराबाहेर आणून साेडून दिल्याचे पाेलीस चाैकशीत समाेर आले़ वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांनी कागदपत्रांची पडताळणी करून व वाहतूक अंमलदार सचिन दवंडे यांच्या हस्ते ती दुचाकी गीता मधुकर तायडे यांना परत केली़