संविधान वाचविण्यासाठी गावागावात करण्यात येणार जागर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 03:10 PM2019-11-13T15:10:53+5:302019-11-13T15:11:00+5:30

प्रत्येक गावात संविधानाचा जागर करण्यात येणार असल्याची माहिती संविधान बचाव संघर्ष समिती निमंत्रक प्रा.विजय आठवले यांनी दिली.

A vigil will be made in the village to save the constitution | संविधान वाचविण्यासाठी गावागावात करण्यात येणार जागर  

संविधान वाचविण्यासाठी गावागावात करण्यात येणार जागर  

Next

अकोला:  सविधान संघर्ष समितीच्या वतीने लोकशाहीची मूल्ये रुजविण्यासाठी प्रत्येक गावात संविधानाचा जागर करण्यात येणार असल्याची माहिती संविधान बचाव संघर्ष समिती निमंत्रक प्रा.विजय आठवले यांनी दिली.शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.राजकीय व्यवस्थेत सविधान संपवण्याचे कट-कारस्थान होत असून त्यामुळेच जनमानसामध्ये ईव्हीएम मशीनचा संभ्रम म निर्माण केला जात आहे .अनेक राजकीय पक्षांनी या संदर्भात जोरदारपणे आंदोलने राबवून ही उद्यापर्यंत निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन रद्द करून बॅलेट द्वारे निवडणुका घेतल्या नाहीत.याशिवाय संविधानिक व्यवस्था नष्ट करण्यासाठी ईव्हीएम मशीन मध्ये नोटा हा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. नोटा हा भारतीय लोकशाही ला पर्याय ठरू शकत नसल्याचे आठवले यांनी सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले अनमोल असे संविधान व त्याची मूल्ये जनमानसात रुजविण्यासाठी व लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी ग्रामीण ते शहरी भागात जोरदारपणे संविधान बचाव संघर्ष समितीच्या पुढाकाराने संविधानाचा जागर करण्यात येणार असून या लोक जागरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याशिवाय संघर्ष समितीच्या वतीने इतर मागण्यासाठी ही तालुका आणि जिल्हा स्तरावर निवेदने, निदर्शने व धरणे आदी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी प्रा.सुरेश मोरे,प्रा.संतोष पेठे,प्रा. बाळकृष्ण खंडारे,प्रा.प्रमिला बोरकर,मंदा शिरसाट,एड. मंगेश बोदडे,राहुल हिवराळे,शैलेश इंगळे,देवगन इंगळे,संतोष रायबोले,डी आर गवई,पुरुषोत्तम वानखडे,डी.एन.     गवई, सुनील गवई, रामदास बोदडे,उज्वला नरवाडे,खंडारे ताई,कविता डोंगरे, निर्मला निकम,सुजाता तिरपुडे  संगीता शिरसाट आदी उपस्थित होते.

Web Title: A vigil will be made in the village to save the constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला