VIDEO : होळी सणाआधी लेंगी उत्सवाची पूर्वतयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 19:29 IST2017-03-10T19:24:17+5:302017-03-10T19:29:20+5:30

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 10 -  होळी हा सण सर्वच जाती-धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. बंजारा समाजातील लोक ...

VIDEO: Holi will take precedence of festivities | VIDEO : होळी सणाआधी लेंगी उत्सवाची पूर्वतयारी

VIDEO : होळी सणाआधी लेंगी उत्सवाची पूर्वतयारी

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 10 -  होळी हा सण सर्वच जाती-धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. बंजारा समाजातील लोक मात्र वेगळ्या पद्धतीने होळीचा सण साजरा करतात. जिल्ह्यातील बंजारा तांड्यांवर सध्या होळीच्या लेंगी उत्सवाची धूम सुरु आहे. सध्या कौलखेड येथीलउन्नती नगर भागात या उत्सवाची पूर्वतयारी सुरु आहे.  प्रा. डॉ. दयाळू किसन राठोड, वासुदेवराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लेंगी उत्सवाचे आयोजन केले असून, या ठिकाणी बंजारा बांधव एकत्र येऊन नृत्यगायन करीत आहेत. 
 
बंजारा समाज हा भटकंती करणारा समाज म्हणून ओळखल्या जातो. पण, अलीकडे बंजारा समाजबांधव नोकरी, व्यवसायानिमित्त गाव, शहरांमध्ये स्थायिक झाला आहे. काळासोबत हा समाज आधुनिक झाला असला, तरी आपल्या चालीरिती, सण-सोहळे, परंपरांचे जतन मोठ्या उत्साहाने केले जाते. लेंगी उत्सवाला होळीच्या दिवशी सुरुवात होते. या दिवशी गावातील नायकाच्या घरासमोर पुरुष व महिला एकत्र येतात. या ठिकाणी वाद्यांच्या तालावर बंजारा समाजबांधव ठेका धरतात. बंजारा भाषेतील लोकगीत व नृत्य सादर करण्यात संपूर्ण रात्र व्यतीत होते. दुस-या दिवशी पहाटे पाच वाजता होळी पेटवली जाते. त्यानंतर लेंगी गीत म्हणत प्रत्येकाच्या घरी जाऊन गेर मागण्याची प्रथा बंजारा समाजात आजही दिसून येते.
 

https://www.dailymotion.com/video/x844txt

Web Title: VIDEO: Holi will take precedence of festivities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.