VIDEO- बांधकाम मजुरांनी काढला अर्धनग्न मोर्चा !
By Admin | Updated: December 26, 2016 14:54 IST2016-12-26T14:54:49+5:302016-12-26T14:54:49+5:30
ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 26 - शहरातील बांधकाम ठप्प असल्यामुळे व नोटाबंदीमुळे आधीच आर्थिक चणचण सहन करावी लागत असलेल्या ...

VIDEO- बांधकाम मजुरांनी काढला अर्धनग्न मोर्चा !
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 26 - शहरातील बांधकाम ठप्प असल्यामुळे व नोटाबंदीमुळे आधीच आर्थिक चणचण सहन करावी लागत असलेल्या बांधकाम मजुरांना कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीसाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र देण्यास मनपा प्रशासनाने नकार दिला आहे. त्यामुळे बांधकाम मजुरांच्या अडचणीत भरच पडली आहे. मनपा हद्दीत काम करणाऱ्या बांधकाम मजुरांना मनपा प्रशासनाने प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशन व ग्रामीण बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने सोमवारी अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन सादर करून आपल्या मागण्या मांडल्या.
अकोला जिल्हा ग्रामीण बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, प्रशांत मेश्राम, अब्दुल बशीर, ग्रामीण अध्यक्ष गणेश हिरोळकर, रमेश आखरे, गणेश नृपनारायण यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या शेकडो बांधकाम मजुरांनी सहभाग नोंदविला. स्थानिक अशोक वाटीका येथून दुपारी २ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. नोंदणी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे, बांधकाम मजूर संघटना जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
मदनलाल धिंग्रा चौक, महात्मा गांधी मार्ग अशी माग्रक्रमणा करीत हा मोर्चा मनपा परिसरात पोहोचला. तेथे पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना मागणीचे निवेदन सादर केले. मोर्चात युवराज खडसे, गौतम मोटघरे, सुरेश कारंडे, मनोज बाविस्कर, अनिल वाघमारे, आत्माराम साठे, गणेश सावळे, साबीर मौलाना, शेख जमीर, शेख लाल, श्रावण रंगारी, सतीष नागदिवे, गुलाब बल्लाळ, बाबुलाल डोंगरे, सतीश वाघ, सुनील तायडे, सुनील वंजारी, सुभाष तायडे, राजू किर्तक, भास्कर सोनोने, चेतन तिरपुडे, राजू सुरवाडे, मदन वासनिक, संदीप नरवणे, सुरेश बोदडे, गजानन लोखंडे, नामदेव निखाडे, सुनील इंगळे, राजू वानखडे यांच्यासह शेकडो बांधकाम मजूर उपस्थित होते.