शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या लाडक्या ‘शकुंतले‘चा लवकरच कायापालट होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 20:03 IST

शतक ओलांडलेली पुरातन ब्रिटिशकालीन मूर्तिजापूर-यवतमाळ,  मूर्तिजापूर-अचलपूर नॅरोगेज शकुंतला आता नव्या स्वरूपात प्रवाशांच्या  भेटीला येणार आहे. यासाठी प्राप्त दीड हजार कोटींच्या निधीतून कामाला सुरुवात होणार आहे, असे माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी माहिती दिली.

ठळक मुद्देदीड हजार कोटींचा मिळाला निधी नव्या रूपात येणार प्रवाशांच्या सेवेतमूर्तिजापूरचे माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: शतक ओलांडलेली पुरातन ब्रिटिशकालीन मूर्तिजापूर-यवतमाळ,  मूर्तिजापूर-अचलपूर नॅरोगेज शकुंतला आता नव्या स्वरूपात प्रवाशांच्या  भेटीला येणार आहे. एकवेळी ही ऐतिहासिक गाडी बंद पडणार की काय, अशी  चिन्हे दिसत असतानाच ही गाडी सुरूच राहावी, यासाठीदेखील भरभक्कम  प्रयत्न करण्यात आले. त्याचीच फलश्रुती म्हणून आता ही गाडी नव्या रूपात  प्रवाशांना बघायला मिळणार आहे, यासाठी प्राप्त दीड हजार कोटींच्या निधीतून  कामाला सुरुवात होणार आहे, असे माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी  कळविले आहे. गरिबांची जीवन वाहिनी म्हणून शकुंतलेला ओळखले जाते. अचलपूर-मूर्तिजा पूर-यवतमाळ अशा या नॅरोगेज रेल्वेला आता ‘अच्छे दिन’ आले आहेत. स्वा तंत्र्योत्तर काळातही ब्रिटिश कंपनी क्लिक निक्सनच्या ताब्यात ही रेल्वे आहे.  खा. भावना गवळी यांच्या प्रयत्नांनी या गाडीचा मार्ग ब्रॉडगेज होण्याचा मार्ग  खुला झाला आहे. या कामासाठी तूर्तास या गाडीला विश्रांती देण्यात आली  आहे. शासनाने गाडीचे रूपडे पालटण्यासाठी दीड हजार कोटींचा भक्कम निधी  मंजूर केल्याने या कामाला गती प्राप्त झाली आहे. खा. भावना गवळी यांनी  यासाठी संसदेसमोर एक याचिका सादर केली होती, हे विशेष. १९१६ मध्ये क्लिक निक्सल अँड कंपनी या ब्रिटिश कंपनीने यवतमाळ-मू िर्तजापूर-अचलपूर-पुलगाव-आर्वी या तीन नॅरोगेज रेल्वे सुरू केल्या होत्या.  आश्‍चर्य म्हणजे देश पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतरही या तिन्ही रेल्वे गाड्या  ब्रिटिश कंपन्यांच्या ताब्यात होत्या. सुरुवातीला या रेल्वेचा वेग अतिशय मंद  असल्याने या गाडीवर टीकाला झाली. आधी सुलोचना आणि नंतर शकुंतला  या नावाने ही गाडी ओळखली जाऊ लागली.

असा आहे 'शंकुतले'चा इतिहास...१९१६ मध्ये सुरू झालेली शकुंतला जवळपास ७0 वर्ष वाफेच्या इंजीनवर  चालत होती. ११0 किलोमीटर अंतर कापायला शकुंतलेला तब्बल ११ तास  लागत होते. नंतर ती डिझेल इंजीनवर धावू लागली. आता तिला याच प्रवासाला  सहा तास लागतात. शकुंतलेचे उत्पन्न व खर्चाचा कुठेही मेळ बसत नाही.  डिझेलच्या वाढत्या किमती, रेल्वे पायलट, गार्ड, स्टेशन मास्तर आणि  कर्मचार्‍यांचे वाढते वेतन यामुळे ही रेल्वे प्रचंड तोट्यात होती. या रेल्वेच्या  मार्गावरील जवळपास सर्वच स्थानके बंद पडली आहेत. आता मात्र शकुंतला  नवीन रूपात समोर येणार, हे निश्‍चित झाले आहे.

ब्रॉडगेजच्या कामला डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये सुरुवात होणार आहे. या  कामाचे भूमिपूजन मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर करायचे ठरविले आहे; मात्र  याबात बैठकीत ठरवायचे आहे.  - भावना गवळी, खासदार 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरRailway Passengerरेल्वे प्रवासी