विदर्भ शकुंतला रेल्वे मुक्ती समितीला यश

By admin | Published: February 13, 2017 12:45 AM2017-02-13T00:45:16+5:302017-02-13T00:45:16+5:30

पुलगाव ते आर्वी नॅरोगेज शकुंतला रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा उल्लेख रेल्वे अंदाजपत्रकाच्या पिंक बुकमध्ये करण्यात आला आहे.

Vidarbha Shakuntala Youth Welfare Committee | विदर्भ शकुंतला रेल्वे मुक्ती समितीला यश

विदर्भ शकुंतला रेल्वे मुक्ती समितीला यश

Next

रोहणा : पुलगाव ते आर्वी नॅरोगेज शकुंतला रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा उल्लेख रेल्वे अंदाजपत्रकाच्या पिंक बुकमध्ये करण्यात आला आहे.
विदर्भातील तीनही नॅरोगेज शंकुतला रेल्वे मार्गाची ब्रिटीश कंपनीच्या ताब्यातून मुक्त होवून या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे म्हणून विदर्भ शकुंतला रेल्वे मुक्ती व विकास कृती समिती रोहणा यांच्यावतीने गत १७ वर्षांत विविध आंदोलनाचे मार्ग अवलंबिले होते. आंदोलनादरम्यान राष्ट्रपती, पंतप्रधान व रेल्वे मंत्री यांना पाच-पाच रुपयांचे मनीआॅर्डर पाठविणे, विद्यार्थ्यांकरवी पोस्टकार्ड पाठविणे, केंद्रीय गृह राज्यमंत्री यांच्याकरवी प्रयत्न करणे, आर्वी येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण, रोहणा येथे २२ दिवसीय साखळी उपोषणही करण्यात आले. अलिकडे १०० किलोमिटर रेल्वे मिशन स्थापन करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही एका शिष्टमंडळाने सदर प्रश्नाची तिव्रता समजावून सांगितली. येथील लोकप्रतिनिधी यांनी ही समस्या जबरदस्त लावून धरत चर्चा घडवून आणली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही अर्थसंकल्पात याला मंजुरी प्रदान केली. विदर्भ शकुंतला रेल्वे मुक्ती व विकास कृती समितीचे बाबासाहेब गलाट, अनिल देवतळे, प्रा. मिसाळकर, प्रकाश टाकळे व जनमंचचे फनिन्द्र रघाटाटे, दिलीप पांडे, रोहणाचे सरपंच सुनील वाघ यांनी प्रयत्न केले. ‘शकुंतलेचा मुक्ती लढा’ या आशयाचे पुस्तक प्रकाशीत करणार असल्याची माहिती देण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Vidarbha Shakuntala Youth Welfare Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.