शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

‘सॉईल स्टॅबिलाइझेशन’चा रस्ता निर्मितीचा विदर्भातील पहिला प्रयोग अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 12:30 IST

अकोला: स्वस्त आणि टिकाऊ म्हणून सिद्ध होत असलेल्या सॉईल स्टॅबिलाइझेशन या प्रक्रियेच्या रस्ता निर्मितीचा विदर्भातील पहिला प्रयोग अकोल्यात सुरू झाला आहे.

- संजय खांडेकरअकोला: स्वस्त आणि टिकाऊ म्हणून सिद्ध होत असलेल्या सॉईल स्टॅबिलाइझेशन या प्रक्रियेच्या रस्ता निर्मितीचा विदर्भातील पहिला प्रयोग अकोल्यात सुरू झाला आहे. काळ्या मातीच्या प्रदेशात सॉईल स्टॅबिलाइझेशनचा प्रयोग वरदान ठरण्याची शक्यता असल्याने अकोला जिल्ह्यातील अकोट-हिवरखेड मार्ग निर्मितीसाठी ही पद्धत अवलंबिली जात आहे. या मार्गावरील सदर प्रयोग यशस्वी झाला, तर भविष्यात याच पद्धतीने विदर्भात मार्ग निर्मिती होण्याचे संकेत आहेत.ज्या प्रदेशात काळी माती आहे, अशा ठिकाणचे रस्ते निर्मितीमध्ये रस्त्यांचा पाया (बेस) तयार करण्यासाठी खडीकरणाच्या विविध स्तरासाठी मोठा खर्च लागतो. विदर्भात शक्यतोवर काळी माती असल्याने एक मीटरपर्यंत खोल खोदकाम करून खडीकरणाद्वारे बेस तयार केले जातो. एवढे करूनही अनेक रस्ते उंच-सखल होतात. त्यासाठी विदेशी तंत्रज्ञानाद्वारे विकसित सॉईल स्टॅबिलाइझेशनचा उपयोग महत्त्वपूर्ण ठरतो आहे. यामध्ये अत्याधुनिक पद्धतीने माती स्थिरीकरण करीत गरम आणि थंड अशा दोन्ही प्रक्रियेचा वापर करून काँक्रिटबेड तयार केला जातो व त्यावर डांबरीकरण केले जाते. अकोला जिल्ह्यातील अकोट-हिवरखेड मार्ग निर्मितीसाठी प्रथमच ही पद्धती राबविली गेली. दिल्ली येथील काबा अ‍ॅण्ड देशमुख कंपनीने हे काम सुरू केले आहे. सॉईल स्टॅबिलाइझेशनसाठी वापरण्यात येणारी यांत्रिक वाहनाची किंमतच तीन कोटींच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.काय आहे ‘सॉईल स्टॅबिलाइझेशन’वीज प्रकल्पातील वेस्टेज (अ‍ॅश) राख, सिमेंट, गिट्टी, मुरूम आणि डांबरीकरणाचा उकरलेला मलबा, एकत्रीतरित्या एका विशिष्ट तापमानात यांत्रिक वाहनात मिसळविले जाते. या मिश्रित मलब्याचा विशिष्ट थर मार्ग निर्मितीच्या फाउंडेशनसाठी वापरला जातो. त्यामुळे काळी माती खाली दबत नाही. त्यानंतर डांबरीकरण केले जाते. सॉईल स्टॅबिलाइझेशन पद्धतीत चुना अस्तित्वात असलेल्या मातीत सुधारणा होते. सोबतच सिमेंट मिश्रणामुळे मजबुती येते. मातीचे मजबुतीकरण, जसे की रस्ते, पार्किंगची जागा, औद्योगिक सुविधा, विमानतळे, बंदर किंवा ट्रॅक बेड तयार करण्यासाठी ही पद्धती महत्त्वपूर्ण ठरली आहे. लखनऊजवळच्या कनोजमध्ये ‘सॉईल स्टॅबिलाइझेशन’चा पहिला प्रयोग यशस्वी झाला. केंद्रीय रस्ते व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी १६ राज्यांतील तज्ज्ञ अभियंता यांना कनोज येथे बोलावून या पद्धतीचा अवलंब करण्याचे सांगितले होते. महाराष्ट्रात काही ठिकाणी हा प्रयोग सुरू असला तरी विदर्भात प्रथमच हा प्रयोग अकोल्यात होत आहे.-जी. व्ही. जोशी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग