रविवारपासून विदर्भातील तापमानात वाढ!
By Admin | Updated: April 20, 2015 01:49 IST2015-04-20T01:49:24+5:302015-04-20T01:49:24+5:30
अकोल्याचे तापमान पोहोचले ४१.८ डीग्री सेल्सिअसपर्यंत.

रविवारपासून विदर्भातील तापमानात वाढ!
अकोला : राज्यातील हवामान कोरडे होताच रविवारपासून तापमानात वाढ झाली असून, विदर्भातील काही भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. रविवारी अकोल्याचे तापमान ४१.८ डीग्री सेल्सिअसपर्यंंत पोहोचल्याने दुपारी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट होता. यावर्षी उन्हाळ्य़ातील प्रत्येक महिन्यात अवकाळी पाऊस होत असल्याने सरासरी कमाल तापमानात घसरण झाली होती. पण पाऊस जाताच विदर्भातील हवमान कोरडे झाले असून, तापमानात वाढ झाली आहे. मागील चोवीस तासात रविवार सकाळी ८.३0 वाजेपर्यंंत कोकणच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाल्याची नोंद पुणे हवामानशास्त्र विभागाने केली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. दरम्यान, गत चोवीस तासात सकाळपर्यंत विदर्भातील कमाल तापमान या प्रमाणे आहे. अकोला ४0.१, बुलडाणा ३८.0, अमरावती ४0.२, यवतमाळ ३८.८, वर्धा ४१.0, नागपूर ४0.८, तर चंद्रपूरचे कमाल तापमान ४0.४ डीग्री सेल्सिअस होते. येत्या २३ एप्रिलपर्यंंत विदर्भातील तापमान कोरडे राहणार असून, पुणे व आसपासच्या परिसरात मात्र २३ एप्रिलपर्यंंंत आकाश अशंत: ढगाळ राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. गत चोवीस तासात रविवार सकाळपर्यंंत राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान जळगाव येथे ४१.२ अंश नोंदविले गेले.