शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात शिवशाही वेटिंगवर...वऱ्हाड  घेऊन जाणाऱ्या मंडळीकडून पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 13:52 IST

अकोला : अनेक भागात शिवशाहीला प्रतिसाद मिळत नसला, तरी विदर्भात मात्र एप्रिल, मे,जूनपर्यंत मोठी मागणी आहे. तीन महिन्यातील लग्न तिथीसाठी बाहेरगावी वऱ्हाड  घेऊन जाणाऱ्या मंडळीकडून शिवशाहीला पहिली पसंती मिळत आहे.

ठळक मुद्देअनेक भागात शिवशाहीला प्रतिसाद मिळत नसला, तरी विदर्भात मात्र एप्रिल, मे,जूनपर्यंत मोठी मागणी आहे. लाल बसगाडी ४४ रुपये प्रति किलोमीटर अंतराने उपलब्ध आहे, तर शिवशाही गाडी ५४ रुपये प्रतिकिलोमीटर अंतराने ठेवली आहे. लालगाडीवर १८ टक्के जीएसटी आणि शिवशाहीवर केवळ ५ टक्के जीएसटी लागत असल्याने नागरिकांकडून शिवशाहीला अधिक पसंती आहे.

- संजय खांडेकर

अकोला : अनेक भागात शिवशाहीला प्रतिसाद मिळत नसला, तरी विदर्भात मात्र एप्रिल, मे,जूनपर्यंत मोठी मागणी आहे. तीन महिन्यातील लग्न तिथीसाठी बाहेरगावी वऱ्हाड  घेऊन जाणाऱ्या मंडळीकडून शिवशाहीला पहिली पसंती मिळत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवशाहीला जास्त पसंती मिळत असल्याने संपूर्ण मे महिना आरक्षित झाला आहे. त्यामुळे अनेक वºहाडी मंडळीला शिवशाहीसाठी वेटिंगवर राहावे लागले.एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात लग्नाची दाट तिथी असून, बाहेरगावच्या लग्न वऱ्हाडसाठी खासगी लक्झरी गाड्या, लालडब्याच्या एसटी, ट्रॅक्स, टाटा सुमो, झायलो आदी गाड्यांची बुकिंग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातल्या त्यात शिवशाही महामंडळाची आणि वातानुकूलीत असल्याने जास्त मागणी आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाची लाल बसगाडी ४४ रुपये प्रति किलोमीटर अंतराने उपलब्ध आहे, तर शिवशाही गाडी ५४ रुपये प्रतिकिलोमीटर अंतराने ठेवली आहे. लालगाडीवर १८ टक्के जीएसटी आणि शिवशाहीवर केवळ ५ टक्के जीएसटी लागत असल्याने नागरिकांकडून शिवशाहीला अधिक पसंती आहे. लग्नसमारंभ आणि इतर समारंभासाठी शिवशाही परवडणाºया दरात उपलब्ध असल्याने आणि वातानुकूलित असल्याने प्रवाशांचा ओढा त्याकडे जास्त आहे. लालपरिच्या बसगाडीत आणि शिवशाहीत दहारु पयांचे अंतर आहे; पण जीएसटीच्या तुलनेत शिवशाही १३ टक्के स्वस्त पडत आहे. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या शिवशाही, लालपरिपेक्षाही स्वस्त ठरत आहे.*दहा शिवशाहींपैकी आठ बुकअकोला आगार क्रमांक एकमध्ये पाच शिवशाही असून, आगार क्रमांक दोनमध्ये पाच शिवशाही आहेत. दहापैकी आठ शिवशाही पुढच्या पंधरा दिवसांसाठी आरक्षित झाल्या आहेत. दैनंदिन फेºयापेक्षा लग्न समारंभात मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शिवशाहीची बुकिंग वेटिंगवर आहे. अकोला आगार क्रमांक दोनला तीन शिवशाही मिळाल्या होत्या. वाशिमकडे दोन शिवशाही होत्या. वाशिम येथे शिवशाहीला प्रतिसाद मिळत नसल्याने तेथील दोन शिवशाही अकोला आगार क्रमांक दोनकडे वळत्या केल्या आहेत.-विदर्भातील उन्हाची तीव्रता अधिक असल्याने वातानुकूलीत शिवशाहीला अधिक पसंती मिळत आहे. सोबतच इतर वाहनांपेक्षा शिवशाही स्वस्त दरात मिळत असल्याने शिवशाही मे महिन्यासाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होत आहे.-अरविंद पिसोडे , व्यवस्थापक, आगार क्रमांक २, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाVidarbhaविदर्भstate transportराज्य परीवहन महामंडळ