विदर्भातील ३८ लाखावर वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकांची महावितरणकडे नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:47 PM2019-03-26T12:47:50+5:302019-03-26T12:48:07+5:30

अकोला : महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालायांतर्गत असलेल्या घरगुती, वाणिज्यीक आणि औद्योगिक कृषीपंप धारक वीज ग्राहक वर्गवारीतील विदर्भातील एकूण 41 ...

Vidarbha regions 38 lakhs electricity customers records mobile number to msedcl | विदर्भातील ३८ लाखावर वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकांची महावितरणकडे नोंद

विदर्भातील ३८ लाखावर वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकांची महावितरणकडे नोंद

googlenewsNext

अकोला : महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालायांतर्गत असलेल्या घरगुती, वाणिज्यीक आणि औद्योगिक कृषीपंप धारक वीज ग्राहक वर्गवारीतील विदर्भातील एकूण 41 लाख 7 हजार 605 ग्राहकांपैकी तब्बल 38 लाख 54 हजार 768 ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंद करण्यात आली असून महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीज ग्राहकांच्या मोबाईलवर वीज सेवेसंबंधित विविध माहिती ‘एसएमएस’द्वारे नियमितपणे पाठविण्यात येत आहे. वीजबिल तयार होताच ग्राहकाने किती वीज वापरली, मीटर रीडिंग, एकूण वीजबिल, सध्याचे रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख आदी माहिती ग्राहकांना या एसएमएसच्या माध्यमातून दिल्या जात आहे. याशिवाय तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधीही वीज ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येत आहे.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी प्रभावी आणि पारदर्शक सेवेसाठी जास्तीतजास्त वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंद करण्याच्या आग्रह धरला होता. त्यांच्या मार्गदर्शनात वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांक नोंदणीत गडचिरोली सारख्या दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील वीजग्राहकांनीही उत्साह दाखवित त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंद महावितरणकडे केली आहे.

मे 2017 मध्ये महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील केवळ 27 टक्के ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली होती आज ती 93.84 टक्के झाली आहे. या ग्राहकंपैकी नागपूर शहर मंडलातील 2 लाख 78 हजार 697 ग्राहकांनी, नागपूर ग्रामिण मंडलातील 3 लाख 20 हजार 550 तर वर्धा मंडलातील 2 लाख 99 हजार 381 ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे. तर चंद्रपूर परिमंडतंर्गत असलेल्या चंद्रपूर मंडलातील 3 लाख 65 हजार 600, गडचिरोली मंडलातील 2 लाख 55 हजार 114 ग्राहकांनी गोंदीया परिमंडलांतर्गत असलेल्या गोंदीया मंडलातील 2 लाख 52 हजार 696 तर भंडारा मंडलातील 2 लाख 67 हजार 567 ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. याचसोबत अकोला परिमंडलांतर्गत असलेल्या अकोला मंडलातील 3 लाख 21 हजार 452 ग्राहकांनी, बुलढाणा मंडलातील 4 लाख 9 हजार 981 ग्राहकांनी तर वाशिम मंडलातील 1 लाख 58 हजार 407 ग्राहकांनी याशिवाय अमरावती परिमंडलांतर्गत असलेल्या अमरावती मंडलातील 5 लाख 8 हजार 704 ग्राहकांनी तर यवतमाळ मंडलातील 4 लाख 16 हजार 619 ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद करीत महावितरणच्या एसएमएसच्या माध्यमातील सर्व सेवा मोबाईलवर मिळविणे सुरु केले आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या कृषी ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाच्या नोंदणीलाही उत्सफ़ुर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत विदर्भातील 2 लाख 52 हजार 167 कृषी ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंद करण्यात आली आहे.

मीटर रिडींगची पुर्वसुचना

ग्राहकांची गैरसोय होवू नये, मीटररिडींग आणि वीजबिलात अचुकता व पारदर्शकता राहावी यासाठी महावितरणच्या ग्राहकांना आता मीटरचे रिडींग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे याची पूर्वसूचना ग्राहकांच्या महावितरणकडील नोंदणीकृत मोबाईलवर एक दिवस अगोदर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. महावितरणने 1 मार्च 2019 पासून राज्यातील नागपूर शहर मंडलसह राज्यातील सहा मंडलात ग्राहकांना मीटर रिडींगची पूर्वसूचना देण्याची प्रक्रिया प्रायोगिक तत्वावर सुरु केली आहे. त्याचा लाभही या ग्राहकांना होणार आहे.

मोबाईल क्रमांक नोंदणीची सुलभ प्रक्रीया

महावितरणकडून ग्राहकांसाठी राबविण्यात येत असलेल्या इतरही विविध उपयुक्त उपक्रमांची माहिती ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर दिली जाते. त्यामुळे ज्या ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली नसेल अशा ग्राहकांनी महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे वीजग्राहकांना स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी. आपल्या नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MREG (स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24×7 सुरु असणार्‍या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. तसेच www.mahadiscom.in संकेतस्थळावरून किंवा महावितरण ॲपद्वारेदेखील मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

Web Title: Vidarbha regions 38 lakhs electricity customers records mobile number to msedcl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.