विदर्भातील सिंचन प्रकल्प रखडलेलेच!

By Admin | Updated: August 27, 2015 00:51 IST2015-08-27T00:51:47+5:302015-08-27T00:51:47+5:30

अकोल्याचे दोन प्रकल्प जोडले थेट मुख्यमंत्री वाररूमला.

Vidarbha Irrigation Project is ready! | विदर्भातील सिंचन प्रकल्प रखडलेलेच!

विदर्भातील सिंचन प्रकल्प रखडलेलेच!

राजरत्न सिरसाट / अकोला: विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या बांधकामासाठी दोन वर्षांंपासून सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने विदर्भ, पश्‍चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पांची कामे रखडली आहेत. त्यामुळे या प्रकल्पांच्या बांधकामाच्या किमती वाढत असून, बुलडाणा जिल्हय़ातील जिगाव प्रकल्पाची किंमत आजमितीस ५ हजार ७00 कोटी एवढी झाली आहे. प्रत्यक्षात आतापर्यंंत या प्रकल्पाच्या बांधकामासाठी १४00 कोटीच प्राप्त झाले आहेत. दरम्यान, अकोला जिल्हय़ातील दोन प्रकल्प थेट मुख्यमंत्र्याच्या वार रू मला जोडण्यात आली आहेत. जलसंपदा विभागाने यावर्षी राज्यासाठी जवळपास ७७00 कोटींची तरतूद केली असून, विदर्भातील सिंचन प्रकल्पाची कामे सुरू करण्यासाठी यावर्षी ३२00 कोटी रकमेची तजवीज करण्यात आली होती. पण, कामे सुरू करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यताच मिळत नसल्याने ही रक्कम खर्च करणार कशी, असे प्रश्न पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना पडले आहेत. मागील वर्षी विदर्भातील अठराशे कोटींचा निधी अखर्चित होता. याच प्रशासकीय मान्यतेअभावी अकोला जिल्हय़ाला मिळालेले ३00 कोटींहून अधिक निधी अखर्चित राहिला आहे. पश्‍चिम विदर्भात आजमितीस सिंचनाचा २ लाख ४७ हजार हेक्टरचा अनुशेष कायम आहे.  बुलडाणा जिल्हय़ातील जिगाव हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आठ वर्षांंपासून रखडला आहे. या प्रकल्पाचे काम रेंगाळल्याने आजमितीस या प्रकल्पाच्या बांधकामाची रक्कम ५ हजार ७00 कोटी एवढी झाली आहे. त्या तुलनेत आतापर्यंंत केवळ १४00 कोटींचा निधी टप्प्याटप्प्याने या प्रकल्पाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे केवळ ४0 टक्कय़ाच्या आतच या प्रकल्पाचे काम झाले आहे. २00८ मध्ये या प्रकल्पाच्या कामाचा मुहूर्त निघाला. त्यावेळी शेतीचे भाव हे ८0 हजार ते एक लाख रुपये एकर होते. आजमितीस एका एकराचे भाव १0 लाख रुपयांवर पोहोचले आहेत. या प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादन करायचे आहे. या भूसंपादनालाच ३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

अकोल्याचे दोन प्रकल्प मुख्यमंत्री वार रू मशी कनेक्ट

        सिंचन प्रकल्पाची कामे जलद गतीने होण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री वार रू म तयार करण्यात आली असून, राज्यातील इतर प्रक ल्पासह अकोला जिल्हय़ातील वाई व शहापूर या दोन प्रकल्पांना थेट मुख्यमंत्री वार रू मला कनेक्ट करण्यात आले आहे. येत्या वर्षात नेरधामणात अडणार पाणी! खारपाणपट्ट्यातील नेरधामणा बॅरेजचे काम ७0 टक्के पूर्ण झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू न बांधण्यात आलेल्या या बॅरेजमध्ये येत्या मार्च २0१६ मध्ये पाणी अडविले जाणार आहे.

Web Title: Vidarbha Irrigation Project is ready!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.