शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील गुंतवणूकदारांना दहा कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 14:47 IST

विदर्भातील ११ जिल्ह्यात लहान गुंतवणूकदारांची दहा कोटींची रक्कम धोक्यात सापडल्याची शंका बाजारपेठेतील तज्ज्ञ दलाल व्यक्त करीत आहेत.

- संजय खांडेकर

अकोला : शेअर बाजारातील नामांकित कंपन्यांचे शेअर सातत्याने कोसळत असल्याने शेअर्सच्या किमती वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमी होत आहेत. यामुळे लहान गुंतवणूकदारांची मूळ रक्कमच बाजारात अडकली आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यात लहान गुंतवणूकदारांची दहा कोटींची रक्कम धोक्यात सापडल्याची शंका बाजारपेठेतील तज्ज्ञ दलाल व्यक्त करीत आहेत.बाजारपेठेतील मंदीमुळे गत काही महिन्यांपासून शेअर बाजारातील नामांकित कंपन्यांचे शेअरचे दर मोठ्या प्रमाणात खाली घसरत आहे. कमी झालेले शेअरचे दर पुन्हा उसळतील, या आशेने लहान गुंतवणूकदार ब्रॅण्डेड कंपनीच्या मोहात पडून गुंतवणूक करीत आहेत; मात्र आहे ते दर देखील आता कंपनी टिकवू शकत नाही, ही स्थिती स्पष्ट झाली आहे. पै-पै करून जमविलेली लहान गुंतवणूदारांची मूळ पुंजीच आता धोक्यात आल्याने लहान गुंतवणूकदार धास्तावले आहेत. विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावतीसह अकरा जिल्ह्यातील लहान गुंतवणूकदारांना याचा किमान दहा कोटींचा जबर आर्थिक फटका बसला आहे. शेअर बाजारातील घसरणीचे कारणक्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेणे आणि व्यावसायातील गुंतवणूक फसणे हे शेअर बाजार घसरणीचे दोन महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे अनेक नामांकित कंपन्या तोट्यात आल्या आहेत. त्याचा फटका सामान्य आणि लहान गुंतवणूकदारांना सोसावा लागत आहे.  नामांकित कंपन्यांचे शेअर दर कमी होताच अनेक जण भाववाढ होण्याच्या मोहात पडून लहान गुंतवणूकदार मोहात पडत आहेत. ही स्थिती आजही आहे. ज्या कंपन्या गेल्या तीन वर्षांत आपल्या शेअर होल्डर्सला लाभांश देऊ शकले नाही, त्या कंपनीची ग्रोथ होऊ शकली नाही. त्या कंपनींच्या शेअरमध्ये गुंतवणूक किती जोखमीची आणि सावधगिरीची आहे, याचा गुंतवणूकदारांनी विचार करावा.- हंसराज अग्रवाल, ब्रोकर, शेअर मार्केट, अकोला.

 

टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकVidarbhaविदर्भAkolaअकोला