विदर्भात थंडीची लाट कायम!
By Admin | Updated: January 25, 2016 02:02 IST2016-01-25T02:02:51+5:302016-01-25T02:02:51+5:30
नागपूर ६.२, गोंदिया ६.९ तर अकोल्याचे किमान तापमान ९.५ कायम.

विदर्भात थंडीची लाट कायम!
अकोला: येत्या चोवीस तासांत विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट कायम असूून, मागील चोवीस तासांत राज्यात सर्वात कमी कमान तापमानाची नोंद नागपूर येथे ६.२ अंश नोंदविण्यात आले. त्या खोलाखाल गोंदिया ६.९ तर अकोल्याचे किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मुख्यालयात ७.४ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद केली आहे.
येत्या २५ जानेवारी रोजी विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्याम, मागील चोवीस तासांत २४ जानेवारी सकाळी ८.३0 वाजेपर्यंत सर्वाधिक कमी तापमान नागपूर येथे नोंदविण्यात आले आहे. तापमान घसरल्याने अकोलेकरांना हुडहुडी भरली असून, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नागरिकांना उबदार कपडे काढण्यास भाग पाडले आहे. नवीन उलनचे कपडे खरेदी करण्यास नागरिकांनी सुरुवात केली आहे. शहरात व जिल्हय़ात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र बघावयास मिळत आहे, तर लहान बालकांना सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात ताप, खोकल्याच्या बाल रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.
शहर किमान तापमान
अकोला ९.५
बुलडाणा १२.२
वाशिम १२.८
अमरावती ९.६
यवतमाळ १0.४
नागपूर ६.२
गोंदिया ६.९
वर्धा ९.0
ब्रह्मपुरी ८.१
चंद्रपूर ८.३