नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्तींना हृदयविकाराचा झटका
By Admin | Updated: April 20, 2015 01:45 IST2015-04-20T01:45:11+5:302015-04-20T01:45:11+5:30
वाशिम जिल्हा दौ-यावर असताना वाशिम जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती झेड.ए. हक यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृती धोक्याबाहेर.

नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्तींना हृदयविकाराचा झटका
वाशिम : वाशिम जिल्हा दौर्यावर असताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा वाशिम जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती झेड.ए. हक यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना येथील क्रिटीकल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. १९ एप्रिल रोजी मालेगाव येथील न्यायालय इमारतीचा स्थानांतरन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा वाशिम जिल्ह्याचे पालक न्या. झेड. ए. हक उपस्थित होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर परत जाताना, सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना लगेचच वाशिम क्रिटीकल हॉस्पिटलला हलविण्यात आले. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. बिबेकर, डॉ. सावळे, डॉ. देवळे, डॉ. कुमरे, डॉ. ठाकरे व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. अनिल कावरखे यांनी तातडीने उपचार सुरू केले. न्यायमूर्ती हक यांची प्रकृती धोक्याबाहेर असून, उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. अनिल कावरखे यांनी दिली.