डेंग्यूसदृश तापाने घेतला चिमुकल्या योगीताचा बळी
By Admin | Updated: October 1, 2014 01:14 IST2014-10-01T01:14:41+5:302014-10-01T01:14:41+5:30
बाश्रीटाकळी तालुक्यातील घटना

डेंग्यूसदृश तापाने घेतला चिमुकल्या योगीताचा बळी
सायखेड (अकोला) : बाश्रीटाकळी तालुक्यातील कोथळी खुर्द येथील जि. प. शाळेत तिसर्या वर्गात शिकणार्या ९ वर्षीय योगीता कोहर या चिमुकलीचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाल्याची घटना सोमवार, २९ सप्टेंबरच्या रात्री घडली.
कोथळी येथील संदीप सखाराम कोहर यांची मुलगी योगीता ऊर्फ वृंदा हिला २७ सप्टेंबर रोजी अचानक ताप चढला.
सुरुवातीला महान येथील खासगी दवाखान्यात तिच्यावर उपचार करण्यात आले; परंतु प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारासाठी अकोला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रक्ताची तपासणी केली असता, तिला डेंग्यू सदृश तापाची लागण झाल्याचे आढळून आले. उपचारांना शरीर साथ देत नसल्याने योगीताची प्रकृती खालावत गेली व अखेर सोमवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. चिमुकल्या योगीताच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला असून, गावातही शोककळा पसरली आहे.