नगराध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडणूक १५ जुलै रोजी!
By Admin | Updated: July 8, 2014 00:22 IST2014-07-08T00:22:27+5:302014-07-08T00:22:27+5:30
जिल्हय़ातील आकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, पातूर व तेल्हारा या पाचही नगरपालिकांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणूक येत्या १५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

नगराध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडणूक १५ जुलै रोजी!
अकोला : जिल्हय़ातील आकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, पातूर व तेल्हारा या पाचही नगरपालिकांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी सोमवारी जाहीर केला. त्यानुसार ही निवडणूक येत्या १५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाचही नगरपालिकांच्या विद्यमान अध्यक्ष व उपाध्यक्षांचा अडीच वर्षांंंचा कालावधी संपुष्टात आला असून, पुढील अडीच वर्षांंंंच्या कालावधीसाठी नगरपालिका अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी ११ जुलै रोजी सकाळी १0 ते दुपारी २ वाजेपर्यंंंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील, त्याच दिवशी दुपारी २ ते ५ या वेळेत नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. १२ जुलै रोजी दुपारी २ वाजेपर्यंंंंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे. १५ जुलै रोजी दुपारी २ वाजता आयोजित नगरपालिकांच्या विशेष सभेत निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी वाचून दाखविण्यात येणार असून, आवश्यक असल्यास निवडणूक घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाचही नगरपालिकांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने, नगरपालिका अध्यक्षांचा प्रभार तहसीलदारांकडे देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी सोमवारी काढला. त्यामध्ये आकोट, मूर्तिजापूर, पातूर व तेल्हारा या चार नगरपालिकांच्या अध्यक्षांचा प्रभार संबंधित तहसीलदारांकडे तर बाळापूर नगरपालिका अध्यक्षांचा प्रभार जिल्हा प्रकल्प अधिकारी (नगरपालिका प्रशासन) पी.यू. गिरी यांच्याकडे देण्यात आला आहे.