मुलीला पळविणा-या ‘त्या’ पशुवैद्यकास कोठडी
By Admin | Updated: October 1, 2014 01:23 IST2014-10-01T01:16:33+5:302014-10-01T01:23:40+5:30
९ वर्षीय मुलीला पळवून नेणारा पशुवैद्यकास न्यायालयीन कोठडी.

मुलीला पळविणा-या ‘त्या’ पशुवैद्यकास कोठडी
अकोला : राधाकृष्ण चित्रपटगृहा-जवळून मोटारसायकलवर ९ वर्षीय मुलीला पळवून नेणारा पशुवैद्यक मधुकर दिलीप गिरी (२५) याला सिव्हिल लाईन पोलिसांनी २५ सप्टेंबर रोजी रात्री अटक केली होती. पोलिसांनी आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. बोरगाव मंजू येथे राहणारी एक ९ वर्षीय मुलगी तिच्या वडील व भावासोबत २४ सप्टेंबर रोजी बहिणीला भेटण्यासाठी अकोल्यात आली होती. रात्री मुलगी, तिचे वडील राधाकृष्ण चित्रपटगृहाजवळ बसची वाट पाहात उभे होते; दारूची हुक्की आल्याने ते मुलांना थांबवून एका वाईनबारवर गेले. दरम्यान, सिरसो येथील पशुवैद्यक मधुकर गिरी याने त्या मुलीला पळवून नेले होते.