शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनी नाफेड केंद्रावर लावल्या वाहनांच्या रांगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 23:22 IST

शेतकर्‍यांच्या मालाची खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने व नाफेडने गत काही दिवसांपासून ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. ३ ऑक्टोबरपासून १३ नोव्हेंबरपर्यंत सात हजार ६00 शेतकर्‍यांनी विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी नोंदणी केली आहे. यात उडीद व सोयाबीन विक्रीसाठी सर्वाधिक शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. 

ठळक मुद्देसात हजारांवर शेतकर्‍यांची ऑनलाइन नोंदणीउडीद, सोयाबीन विक्रीसाठी सर्वाधिक नोंदणी 

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकर्‍यांच्या मालाची खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने व नाफेडने गत काही दिवसांपासून ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. तूर खरेदीच्यावेळी नाफेडच्या केंद्रावर गोंधळ उडाला होता. तो पुन्हा होऊ नये, या दृष्टिकोनातून शेतमालाची ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे. ३ ऑक्टोबरपासून १३ नोव्हेंबरपर्यंत सात हजार ६00 शेतकर्‍यांनी विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी नोंदणी केली आहे. यात उडीद व सोयाबीन विक्रीसाठी सर्वाधिक शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. खरीप हंगामामध्ये सरासरी गुणवत्ता असलेल्या शेतमालाला शासनाने आधारभूत दर जाहीर केले आहेत. मूग, उडीद शेतमालाच्या खरेदीसाठी ३ ऑक्टोबरपासून शेतकर्‍यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे. शेतकर्‍यांच्या शेतमालाची नोंदणी केल्यानंतर शेतकर्‍यांना शेतमाल कृषी उत्पन्न बाजारात समितीतील नाफेडच्या खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एक तारीख दिली जात आहे. या तारखेवर शेतकर्‍याने नाफेडच्या केंद्रावर आपला शेतमाल आणावा. नाफेड केंद्रावर हा शेतमाल आधारभूत दराने खरेदी करण्यात येत आहे. दररोज नाफेडच्या केंद्रावर १00 ते १२५ शेतकर्‍यांच्या शेतमालाची सरासरी गुणवत्ता तपासून खरेदी करण्यात येत आहे. नाफेडच्या केंद्रांवर शेतमालाच्या वाहनांच्या रांगा लागत असूून, शांततेत खरेदी करण्यात येत आहे. शेतकरी दररोज उडीद, मूग, सोयाबीन आणि तूर विक्रीसाठी आणत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्‍याद्वारे शेतमालाला आधारभूत भाव मिळत नसल्याने, शेतकर्‍यांचा कल नाफेडच्या केंद्राकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी नाफेड केंद्राने दिलेल्या तारखेवर शेतमाल आणण्यास प्राधान्य देत आहेत. शेतमालाची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी आलेल्या शेतकर्‍याच्या मोबाइलवर संदेश देण्यात येऊन शेतमाल केंद्रावर आणण्यासाठी तारीख देण्यात येत आहे. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी शेतकर्‍यांना आधार कार्ड, बँक पासबुक, सात-बारा उतारा, खरिपाच्या संपूर्ण पिकांचा पीकपेरा व त्यामध्ये काय-काय पेरणी केली आहे, याची माहिती मागितली जात आहे. 

बाजार समितीत सोयाबीनची सर्वाधिक आवकअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्यस्थितीत सोयाबीनची आवक होत असून, आतापर्यंत ४ हजार २१५ क्विंटलची आवक झाली आहे. त्यापाठोपाठ तुरीची ५९५ क्विंटल, मूग ३९0 क्विंटल, उडीद ४९६ क्विंटलची आवक झाली असून, शेतकर्‍यांचा शेतमाल विक्रीसाठी सर्वाधिक ओढा हा नाफेडच्या खरेदी केंद्रावरच असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :market yardमार्केट यार्डFarmerशेतकरी