ओवाळणी भोवली अन् युवकास चोपले
By Admin | Updated: January 28, 2016 00:57 IST2016-01-28T00:44:50+5:302016-01-28T00:57:31+5:30
नृत्य करणा-या शाळकरी मुलीला १00 रुपयांची ओवाळणी घातली होती.

ओवाळणी भोवली अन् युवकास चोपले
अकोला: गणतंत्र दिनानिमित्त शहरासह खेड्यातील शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असतानाच चांदूर येथील एका युवकाने मात्र नृत्य करणार्या एका शाळकरी मुलीला १00 रुपयांची ओवाळणी घातल्याने या युवकास गावातीलच तीन ते चार युवकांनी बेदम चोपल्याची घटना घडली. प्रकरण खदान पोलिसांपर्यंत पोहोचले; मात्र गावकर्यांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण आपसात मिटविले. चांदूर येथील जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत गणतंत्र दिनानिमित्त सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहावीत असलेल्या एका विद्यार्थिनीने नृत्य सादर केले. विद्यार्थिनीचे नृत्य सुरू असतानाच अतिउत्साही एका युवकाने व्यासपीठावर जाऊन मुलीस १00 रुपयांची ओवाळणी घातली. आणि ती नोट एका शिक्षिकेच्या हातात देऊन खाली उतरला. युवक व्यासपीठावरून खाली येताच शाळकरी मुलीच्या नातेवाईक असलेल्या तीन युवकांनी ओवाळणी घालणार्या युवकास बेदम चोपले. जखमी युवकास तातडीने सवरेपचार रुग्णालयात भरती केले.