वसारीवासीयांनी गाव काढले विक्रीला!
By Admin | Updated: April 4, 2016 02:12 IST2016-04-04T02:12:21+5:302016-04-04T02:12:21+5:30
वाशिम जिल्ह्यातील प्रकार; लोकप्रतिनिधींवर रोष, दुष्काळामुळे ग्रामस्थ हतबल.

वसारीवासीयांनी गाव काढले विक्रीला!
शिरपूर जैन (जि. वाशिम): सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशातच शासनाकडून मदतही मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. या परिस्थितीला कंटाळून जामदरा गावाने खरीप हंगामावरच बहिष्कार घातल्यानंतर, आता मालेगाव तालुक्यातील वसारी गाव ग्रामस्थांनी चक्क विक्रीला काढले आहे. येथील शेतकर्यांनी ३ एप्रिल रोजी दुपारी गावातील बसस्थानक चौकात गाव विक्रीला काढल्याचे फलक लावून ठिय्या दिला. वाशिम जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. चार, पाच वर्षांंपासून थअवर्षणामुळे अत्यल्प उत्पादन मिळत आहे. दरवर्षी नशिबी उपेक्षाच येत असल्यामुळे आता शेतकर्यांची परिस्थितीशी लढण्याची हिंमतच राहीलेली नाही. यातूनच आता खरीप हंगामावर बहिष्कार टाकणे, तसेच गाव विक्रीला काढणे, यासारखे निर्णय शेतकरी घेत आहेत. दुष्काळी परिस्थिती असताना शासनाने अपेक्षित मदत केली नसल्यामुळे वसारी येथील गावकर्यांनी रोष व्यक्त करीत, ह्यदुष्काळग्रस्तांना मदत द्या, नाही तर गाव विकत घ्याह्ण असे फलक लावून गाव विक्रीस काढले आहे. रविवारी गावातील बहुतांश नागरिकांनी हा फलक लावून आगळेवेगळे आंदोलन केले. गावातील बसस्थानक चौकात शेकडो गावकर्यांनी ठिय्या दिला. फलकावर ह्यआमचे आमदार, खासदार कोणी पाहिलेत का?ह्ण असा प्रश्न करीत, त्यांना शोधून देणार्यास दुष्काळग्रस्त शेतकर्यांकडून दोन रुपये इनाम ठेवण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात शिवाजी लादे, भगवान जाधव, शालिक जाधव यांच्या मार्गदर्शनात शेकडो गावकरी जमले होते. यावेळी शासन आणि लोकप्रतिनिधींबाबत रोष व्यक्त करून, ह्यदुष्काळी मदत द्या, नाही तर गाव विकत घ्याह्ण अशा घोषणाही देण्यात आल्या. खासदार, आमदार दाखवा; बक्षीस मिळवा! मालेगाव तालुक्यातील वसारी हे गाव अकोला लोकसभा मतदारसंघात येते. येथील खासदार संजय धोत्रे दहा वर्षांंपासून एकदाही गावात आले नाही, तसेच आमदार अमित झनकही लग्नप्रसंग सोडले, तर गावातील समस्या ऐकण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे आमदार, खासदार दाखवा व दोन रुपये बक्षीस मिळवा, असे फलक गावकर्यांनी लावले. गावात दुष्काळ असून, अजून कोणतीच मदत मिळाली नाही. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असून, गावाकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी फिरकूनही पाहत नाहीत. त्यामुळे मदत मिळण्यासाठी वसारीवासीयांनी गाव विक्रीला काढले आहे.