वरूण राजाच्या साक्षीने बाप्पाला निरोप

By Admin | Updated: September 9, 2014 21:14 IST2014-09-09T21:14:09+5:302014-09-09T21:14:29+5:30

अकोला येथील गणेश विसर्जन सोहळा उत्साहात.

Varun Raja's testimony goes to Bappa | वरूण राजाच्या साक्षीने बाप्पाला निरोप

वरूण राजाच्या साक्षीने बाप्पाला निरोप

अकोला : भव्य मिरवणूक, सर्वत्र गुलाल आणि फुलांची उधळण, संगीताच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि गणपतीचाअखंड जयजयकार असे भक्तिमय वातावरण आणि वरून बरसणार्‍या पावसाच्या धारा, अशा वातावरणात सोमवारी भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. पुढच्या वर्षी लवकर या! अशी प्रार्थना करीत भक्तांनी गणरायाचे विसर्जन केले.
विसर्जन मिरवणुकीला सकाळी १0.३0 वाजता जयहिंद चौकातून प्रारंभ झाला. येथे श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव गावंडे, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिसन बाजोरिया, हरिदास भदे, महापौर ज्योत्स्ना गवई यांच्या हस्ते मिरवणुकीतील पहिला मानाचा बाराभाई गणपतीचे पूजन करण्यात आले. माजी आमदार बबनराव चौधरी, काँग्रेस महानगर अध्यक्ष मदन भरगड, भाजप महानगर अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजय तापडिया, हरीश आलिमचंदानी, रमाकांत खेतान, अँड. मोतिसिंग मोहता, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश मिश्रा, जिल्हाधिकारी अरुण शिंदे, पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीणा, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, महापालिका आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, आदी उपस्थित होते. यानंतर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या राजेश्‍वर गणेशोत्सव मंडळ, तिसर्‍या क्रमांकावरील जागेश्‍वर गणेशोत्सव मंडळ व चौथ्या क्रमांकावरील खोलेश्‍वर मंडळ या मानाच्या गणपतीचेदेखील मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

Web Title: Varun Raja's testimony goes to Bappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.