वाहून गेलेला युवक बेपत्ताच

By Admin | Updated: June 29, 2016 00:34 IST2016-06-29T00:29:21+5:302016-06-29T00:34:55+5:30

जळगाव जामोद येथील पुरात वाहून गेलेला युवकाचा अद्याप शोध लागला नाही.

The vanished young man disappeared | वाहून गेलेला युवक बेपत्ताच

वाहून गेलेला युवक बेपत्ताच

जळगाव जामोद (जि. बुलडाणा): जामोद येथील बेंबळा नदीला आलेल्या पुरात सोमवारी वाहून गेलेला तरुण वसंत रमेश बोबडे याचा अद्याप शोध लागला नाही. शासकीय पातळीवर युद्धस्तरावर शोधकार्य सुरू असल्याची माहिती तहसीलदार हेळकर यांनी दिली.
सोमवारी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे नदी -नाल्यांना पूर आला. बेंबळा नदीला आलेल्या पुरात वसंत बोबडे हा युवक वाहून गेला. या युवकाचा शोध पोलीस व महसूल विभागाकडून घेण्यात येत आहे; परंतु अद्यापही युवकाचा पत्ता लागला नाही. तसेच रामदास राऊत व अवचीत क्षीरसागर या खेर्डा बु. येथील शेतकर्‍यांच्या बैलगाडीसह चार बैल लोढय़ात वाहून गेले होते. एका बैलाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले तर उर्वरित तीन बैल मंगळवारी मृतावस्थेत आढळले. वाहून गेलेल्या युवकाची सर्वत्र शोधा-शोध सुरू आहे.

Web Title: The vanished young man disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.