शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘वंचित’ करणार पराभवाचे चिंतन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 14:37 IST

वंचित बहुजन आघाडी पराभवाचे चिंतन करणार असून, पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यात येणार आहे.

- संतोष येलकरअकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांना पराभव पत्करावा लागला. २०१४ मधील निवडणुकीच्या तुलनेत ४० हजार ७२ मतांची वाढ झाली असली, तरी पराभव झाला आहे. त्यानुषंगाने मतदान केंद्रनिहाय मतदानाची आकडेवारी समोर आल्यानंतर, वंचित बहुजन आघाडी पराभवाचे चिंतन करणार असून, पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यात येणार आहे.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये ५ लाख ५४ हजार ४४४ मते प्राप्त करून २ लाख ७५ हजार ५९६ मतांची आघाडी घेत भाजपाचे अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी विजय प्राप्त केला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ७८ हजार ८४८ मते मिळाली. २०१४ मधील अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अ‍ॅड. आंबेडकर यांनी २ लाख ३८ हजार ७७६ मते प्राप्त करून ते तिसऱ्या क्रमांकावर होते. २०१९ च्या निवडणुकीत अ‍ॅड. आंबेडकर यांनी २ लाख ७८ हजार ८४८ मते प्राप्त करून, दुसºया क्रमांकावर राहिले. २०१४ मधील निवडणुकीत अ‍ॅड. आंबेडकर यांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत यावेळी ४० हजार ७२ मतांची वाढ झाली असली तरी, पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानुषंगाने मतदान केंद्रनिहाय झालेल्या मतदानाच्या आकडेवारीची माहिती प्राप्त झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पराभवाच्या कारणांची मीमांसा करण्यात येणार आहे. त्यामध्ये मते कमी मिळण्याच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर चिंतन करण्यात येणार आहे.‘अकोला पश्चिम’मध्ये मिळाली कमी मते!अकोला लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना २ लाख ७८ हजार ८४८ मते मिळाली. त्यामध्ये सर्वात कमी मते अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मिळाली. या मतदारसंघात अ‍ॅड. आंबेडकर यांना केवळ २३ हजार ७४१ मते मिळाली.

निवडणुकीपूर्वी अशी केली होती तयारी!लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये बुथ कमिटी बांधणी, बुथ कमिटीमधील सदस्यांना प्रशिक्षण, गाव तेथे शाखा, महिला आघाडी, युवक आघाडी शाखा स्थापन करण्यात आल्या होत्या. मतदार नोंदणीसाठी पक्षाच्यावतीने प्रयत्न करण्यात आले होते, तसेच गावा-गावांत दौरे करून मतदारांशी संवाद साधण्याचा कार्यक्रमही राबविण्यात आला होता. निवडणुकीपूर्वी सुरू केलेली तयारी आणि केलेल्या प्रयत्नांच्या आधारे लोकसभा निवडणुकीत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विजयाची अपेक्षा करण्यात येत होती; मात्र त्या तुलनेत मते मिळाली नसल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkolaअकोलाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल