शेगाव वारीला जाणा-या वकिलास रेल्वेने चिरडले

By Admin | Updated: November 23, 2014 01:25 IST2014-11-23T01:25:03+5:302014-11-23T01:25:03+5:30

अकोल्यातील बारा खोलीनजिक अपघात.

Vakilas going to Shegaon-Worli was hit by the train | शेगाव वारीला जाणा-या वकिलास रेल्वेने चिरडले

शेगाव वारीला जाणा-या वकिलास रेल्वेने चिरडले

अकोला - डाबकी रोडवरील रहिवासी अँड. किरण कुळकर्णी यांना रेल्वेने चिरडल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास बारा खोलीनजिक घडली. अँड. कुळकर्णी हे शेगाव येथे पायदळ वारीसाठी निघाले होते. काही महिलांना रेल्वे रुळ क्रॉसिंग केल्यानंतर ते रेल्वे रुळ क्रॉस करीत असतानाच त्यांना रेल्वेने चिरडल्याची माहिती त्यांच्यासोबत असलेल्यांनी दिली. डाबकी रोडवरील रहिवासी अँड. किरण कुळकर्णी हे आपल्या मित्र परिवारासोबत शनिवारी सायंकाळी डाबकी गेटवरून शेगाव येथे पायदळ वारीसाठी निघाले होते. बारा खोलीनजिक गेल्यानंतर त्यांनी ह्यटॉर्चह्ण चा उजेड दाखवून सोबत असलेल्या महिलांना रेल्वे रुळ क्रॉस करण्यास मदत केली. त्यानंतर ते रेल्वे रुळ क्रॉस करीत असतानाच भरधाव आलेल्या ट्रेनने त्यांना आत ओढले. यामध्ये अँड. किरण कुळकर्णी यांचा जागेवरच मृत्यू झाला.

Web Title: Vakilas going to Shegaon-Worli was hit by the train