वैशाली सामंत व प्रसन्नजित कोसंबीच्या गाण्यांवर थिरकली तरुणाई
By Admin | Updated: March 22, 2016 02:13 IST2016-03-22T02:13:25+5:302016-03-22T02:13:25+5:30
लोकमत सखी मंचच्या ‘जल्लोष-२0१६’ ला लाभला अकोलेकरांचा उदंड प्रतिसाद.

वैशाली सामंत व प्रसन्नजित कोसंबीच्या गाण्यांवर थिरकली तरुणाई
अकोला: सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, प्रसन्नजित कोसंबी व प्रिया वैद्य यांनी हिंदी व मराठी चित्रपटांतील गीते सादर करून, 'लोकमत'चा चाहता वर्ग असलेल्या अकोलेकरांचे मन जिंकून घेतले. रविवार, २0 मार्च रोजी सायंकाळी मुंगीलाल बाजोरिया शाळेच्या प्रांगणात ह्यलोकमतह्ण सखी मंचद्वारा आयोजित करण्यात आलेल्या 'जल्लोष-२0१६' कार्यक्रमाला अकोलेकर रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
'लोकमत' अकोला आवृत्तीच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या संगीतमय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापौर उज्ज्वला देशमुख, प्रा. तुकाराम बिरकड, 'लोकमत' अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले व सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रारंभी ह्यएच.पी. डान्स ग्रुपह्णच्या युवक-युवतींनी गणेश वंदना सादर केली. दीपक कडलक यांच्या बहारदार संचालनात सुरू झालेल्या या गाण्यांच्या कार्यक्रमात सर्वप्रथम कोल्हापूरचा रांगडा गायक प्रसन्नजित कोसंबी याने गोंधळ गीत सादर करून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. यानंतर मराठी, हिंदीसह इतर अनेक भाषांमधून पार्श्वगायन करणारी सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत हिने 'ही गुलाबी हवा..' हे गीत सादर करून रसिक प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळविला.
अकोल्यात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे 'लोकमत'शी आपले ऋणानुबंधाचे कसे घट्ट झाले आहे, याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करून वैशाली सामंत हिने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, सिव्हिल लाइन पोलीस ठाण्याचे ठाणेदार घनश्याम पाटील, माजी महापौर सुमनताई गावंडे, उषा विरक, मंजूषा शेळके, प्रतिभा अवचार, देवश्री ठाकरे, वैशाली शेळके, मंगला म्हैसने, गीतांजली शेगोकार, सुनीता अग्रवाल, माधुरी मेश्राम, सुजाता अहिर, सुनीता मेश्राम, देवराव अहिर, राधा बिरकड, अँड. अनंत खेळकर यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील गणमान्य व्यक्ती, लोकमत सखी मंचच्या महिला सदस्य व इतर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.