लसीकरणाचा आलेख पुन्हा घसरला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:23 IST2021-09-12T04:23:56+5:302021-09-12T04:23:56+5:30
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या चार दिवसात लसीकरणाला गती होती. दररोज आठ हजारांपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण पहिल्या चार दिवसांतच दिले गेले. ...

लसीकरणाचा आलेख पुन्हा घसरला!
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या चार दिवसात लसीकरणाला गती होती. दररोज आठ हजारांपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण पहिल्या चार दिवसांतच दिले गेले. या कालावधीत सुमारे ५० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, मात्र त्यानंतर जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग मंद झाल्याचे दिसून येते. पहिल्या चार दिवसात जिल्ह्यात ३४ हजार ५०६ लसी देण्यात आल्या. ५ तारखेपासून मात्र यामध्ये मोठी घट झाल्याचे दिसून आले. ६ ते १० सप्टेंबर या पाच दिवसात २१ हजार ५२८ लसी देण्यात आल्या. जिल्ह्याचे एकूण उद्दिष्ट आणि सद्यस्थिती लक्षात घेता मुबलक साठा आणि वाढीव सत्र कायम राहिल्यास मोहिमेला गती येईल.
गंभीर लक्षणांपासून होणार बचाव
कोविड प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते. कोविडचे दोन्ही डोस घेणाऱ्यांनाही कोविडची लागण झाल्याचे प्रकार राज्यात समोर आले आहेत, मात्र इतर रुग्णांच्या तुलनेत या रुग्णांमध्ये काेविडचे गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत. लस घेणाऱ्यांना कोविडमुळे मृत्यूचा धोका कमी असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
आठवड्यातील स्थिती
- पहिले चार दिवस
१ सप्टेंबर : ७१४९
२ सप्टेंबर : ९९८६
३ सप्टेंबर : ८०५०
४ सप्टेंबर : ९३२१
५ सप्टेंबर : २७४२
- एकूण : ३७२४८
दुसरे पाच दिवस
६ सप्टेंबर : २३५७
७ सप्टेंबर : ५६५३
८ सप्टेंबर : ५७१३
९ सप्टेंबर : ७,१२६
१० सप्टेंबर : ६७९
एकूण - २१,५२८