कुरूम येथे लसीकरण मोहीम यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:12 IST2021-02-05T06:12:08+5:302021-02-05T06:12:08+5:30
यावेळी मूर्तिजापूर पं. स. सदस्या सविता ज्योतीबा माहुरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहलता ...

कुरूम येथे लसीकरण मोहीम यशस्वी
यावेळी मूर्तिजापूर पं. स. सदस्या सविता ज्योतीबा माहुरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहलता अरबट, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ. शारदा चुळे, साथरोग अधिकारी संजय घाटे, कुष्ठरोग तंत्रज्ञ मोहन साहारे,आरोग्य सहाय्यिका सत्यभामा डाबेराव, औषध निर्माण अधिकारी स्नेहा मार्गे, आरोग्यसेवक नागराज पटले, अधिपरिचारीका रिता घनबहादुर, आरोग्यसेविका संगीता गिरी, आशासेविका सुवर्णा देशमुख, सुनीता शिरभाते, सुर्यकांता वर्हेकर,गटप्रवर्तक ज्योती उभयकर, परिचर पंजाब सरदार, देवानंद सरदार, वाहनचालक शेख हुसेन, विकी माहुरे हजर होते.
प्रा. आ. केंद्र कार्यक्षेत्रातील ३२ गावांत ही मोहीम राबविण्यात आली.