शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
2
Top Marathi News LIVE Updates: बोरीवलीतील अॅनेक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
3
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
4
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
5
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
6
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
7
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
8
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
9
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
10
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
11
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
12
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
13
मोबाईल देणं पडलं महागात! अल्पवयीन मुलाने आईच्या खात्यातून शेजाऱ्याला पाठवले ३३ लाख अन् पुढे जे झालं.. 
14
IPL 2026 Playoffs Race : RCB सह GT चं तिकीट 'कन्फर्म'; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस
15
इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?
16
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
17
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
18
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
19
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
20
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
Daily Top 2Weekly Top 5

कामगार कार्यालयाला रिक्त पदांची वाळवी

By admin | Updated: May 10, 2014 19:21 IST

कामगार आयुक्त कार्यालयालाच रिक्तपदाची वाळवी

 बुलडाणा : विविध कामगार कायद्याची अंमलबजावणी करून त्याचा लाभ कामगारांना मिळवून देण्याबरोबरच कामगारांच्या न्याय हक्कासाठी झटणार्‍या कामगार आयुक्त कार्यालयालाच रिक्तपदाची वाळवी लागल्याने त्या कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. बुलडाणा या जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्य कार्यालय असून खामगाव, शेगाव, मेहकर आणि मलकापूर येथे तालुकास्तरीय कामगार कार्यालय आहेत; मात्र खामगाव, मेहकर आणि मलकापूर येथे गेल्या अनेक वर्षापासून येथे शॉप इन्स्पेक्टर ही पदे रिक्त आहेत. खामगाव येथे तर तब्बल एक तपापासून हे पद भरलेले नाही. बुलडाणा या जिल्ह्याच्या ठिकाणी शिपाई आणि कामगार आयुक्ताचे पद रिक्त आहे. याशिवाय मलकापूर येथील कार्यालयात लिपिकाचे पद भरलेले नाही. प्रत्येक दुकानदारांनी दुकानाचे नियमानुसार लायसन्स काढलेले आहे किंवा नाही, त्याचे नियमित नूतणीकरण केले आहे काय? विविध दुकान, हॉटेल्स तसेच कारखाने, औद्योगिक क्षेत्र, जेथे स्थायी-अस्थायी कामगार काम करतात त्या कामगारांना वेळेवर व कामगार कायद्यानुसार पगार दिल्या जातो किंवा नाही, त्यांना नियमानुसार सुट्या मिळतात काय? याशिवाय बालकामगारांची कामातून सुटका करून देणे, अशी शेकडो कामे या कार्यालयातील कर्मचार्‍यांना करावी लागतात; मात्र या सार्‍या कामासाठी लागणारे मनुष्यबळ पुरेसे नसल्यामुळे शासनाच्या प्रत्येक नियम व ठरवून दिलेल्या कामाची अंमलबजावणी करताना या कर्मचार्‍यांना अक्षरश: सर्कस करावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही पदे न भरल्यामुळे आहे त्या कर्मचार्‍यावर या पदांचा अतिरिक्त पदभार पडत असल्यामुळे कामे योग्य पद्धतीने होत नाहीत. एकीकडे वाढती कामगारांची संख्या, त्यात कामाचा वाढलेला बोजा यामध्ये कर्मचार्‍यांची संख्या वाढविण्याऐवजी आहे त्या कर्मचार्‍यांची रिक्त पदे शासन भरत नसल्यामुळे कामगारांना न्याय, हक्क मिळवून देण्यास हे कार्यालय कमी पडत आहे.

अशी आहेत कामगार कार्यालयाची कामे

कामगार आयुक्त हा कायदे व धोरण यांची अंमलबजावणी करण्याकरिता कामगार विभागाचा प्रमुख असतो. औद्योगिक कलह अधिनियम (१९४७), भारतीय कामगार संघटना अधिनियम (१९२६), किमान वेतन अधिनियम (१९४८) वगैरे महाराष्ट्र राज्यातील कायदे यांची अंमलबजावणी, ही कार्ये कामगार आयुक्तांकडे असतात. त्यांच्या मदतीला वेगवेगळ्या कायद्यांच्या कक्षेखाली येणारे विषय हाताळण्याकरिता कामगार उपआयुक्त, सहायक कामगार आयुक्त, मुख्य सरकारी कामगार अधिकारी, सरकारी कामगार अधिकारी, सेवायोजन उपसंचालक, कामगार संघटना उपनिबंधक वगैरे अधिकारी असतात.

विविध कामगार कायद्याची अंमलबजावणी करून त्याचा लाभ कामगारांना मिळवून देणे. कामगार व मालक यांच्या मध्ये कामगारांच्या प्रश्नावरून निर्माण होणार्‍या किंवा निर्माण झालेल्या औद्योगिक विविदात वेळीच हस्तक्षेप करून समेट घडवून आणणे व औद्योगिक शांतता निर्माण करणे व औद्योगिक संबंध सौहार्दपूर्ण ठेवणे. मालक कामगार संघटनाच्या संबंधात पोषक वातावरण निर्माण करून निकोप औद्योगिक संबंध वृद्धींगत करून कामगारांच्या न्याय हक्काचे संरक्षण करणे ही कामे कामगार कार्यालयाला करावी लागतात.