‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकांचा वापर करा!
By Admin | Updated: April 22, 2017 01:14 IST2017-04-22T01:14:00+5:302017-04-22T01:14:00+5:30
‘लोकतंत्र बचाओ आंदोलन’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकांचा वापर करा!
अकोला : निवडणुकांमध्ये मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा (ईव्हीएम) वापर न करता मतपत्रिकांचा वापर करण्यात यावा, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या ह्यराष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाओ आंदोलनह्ण अकोला जिल्हा शाखेच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढून आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविले.
ह्यईव्हीएमह्ण वापराबाबत निकषांचा अभाव असून, ह्यईव्हीएमह्ण फेरमतमोजणीची सुविधा नाही. ईव्हीएममुळे निवडणुका पारदर्शकरीत्या होण्यात बाधा येत आहे. या व इतर कारणांमुळे निवडणुकांमध्ये मतदानासाठी ह्यईव्हीएमह्णऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाओ आंदोलनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. यावेळी गजानन दौड, जितेंद्र दाभाडे, राहुल इंगळे, बाळासाहेब इंगोले, अंकुश सिरसाट, आकाश चापके, राजेंद्र इंगोले, सारंग निखाडे, अभिजित ताजने, जायले, विकी पळसपगार, गुलाबराव उमाळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.