शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू शाळेतील शिक्षिका गायब; वर्गाची जबाबदारी नातेवाइकावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 02:03 IST

होय, हे खरे आहे. मनपाच्या शिक्षण विभागाचा कवडीचाही धाक नसल्यामुळे शिक्षकांनी मनमानीचा कळस गाठला आहे. शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चक्क नातेवाईक महिलेला बसवून शिक्षिका गायब झाल्याचा प्रकार शिवसेनेचे नगरसेवक शशीकांत चोपडे यांनी सोमवारी चव्हाट्यावर आणला.

ठळक मुद्देमनपा शाळेतील प्रकार शिवसेना नगरसेवकामुळे शिक्षकांच्या मनमानीचा भंडाफोड

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: होय, हे खरे आहे. मनपाच्या शिक्षण विभागाचा कवडीचाही धाक नसल्यामुळे शिक्षकांनी मनमानीचा कळस गाठला आहे. शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी चक्क नातेवाईक महिलेला बसवून शिक्षिका गायब झाल्याचा प्रकार शिवसेनेचे नगरसेवक शशीकांत चोपडे यांनी सोमवारी चव्हाट्यावर आणला. जुने शहरातील मनपा उर्दू मुलांची शाळा क्र. ४ व उर्दू मुलींची शाळा क्रमांक १0 मध्ये उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे महापालिकेची मान शरमेने खाली झुकली आहे.जुने शहरातील प्रभाग ९ मधील उर्दू मुलांची शाळा क्र.४  व उर्दू मुलींची शाळा क्रमांक १0 मध्ये शिक्षकांच्या मनमानी कारभाराला ऊत आला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत शाळेतील शिक्षकांनी खेळ चालवल्याची बाब शिवसेनेचे नगरसेवक शशीकांत चोपडे यांच्या निदर्शनास आली. यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनीसुद्धा चोपडे यांना अवगत केले होते. सोमवारी दुपारी नगरसेवक चोपडे यांनी शाळेची आकस्मिक पाहणी केली असता मुख्याध्यापकांसह काही शिक्षिक अनुपस्थित असल्याचे दिसून आले. हा प्रकार कमी म्हणून की काय, चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नातेवाईक महिलांना बसवून जबाबदार शिक्षिका अनुपस्थित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याविषयी चोपडे यांनी उपमहापौर वैशाली शेळके, महिला व बालकल्याण सभापती सारिका जयस्वाल यांच्याकडे तक्रार केली असता दोन्ही महिला पदाधिकार्‍यांनी शाळेवर धाव घेतली. उर्दू मुलांची शाळा क्र.४ ,उर्दू मुलींची शाळा क्र.१0 मधील शिक्षकांचे हजेरी पुस्तिका तपासली असता शिक्षिकांसह खुद्द मुख्याध्यापकही अनुपस्थित असल्याचे आढळून आले. यावेळी शाळेतील वर्गखोल्या, स्वच्छतागृहांची तपासणी केली असता कमालीची अस्वच्छता आढळून आली. स्वच्छतागृहांमध्ये प्रचंड घाण साचल्याचे चित्र होते. याप्रकरणी मनपा प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मुख्याध्यापक, शिक्षक रजेवरसंबंधित उर्दू शाळेचे मुख्याध्यापक व नातेवाईक महिलेला वर्गात बसवणारी शिक्षिका रजेवर असल्याची बतावणी उपस्थित शिक्षकांनी केली. यावेळी मुख्याध्यापक व शिक्षिकेने रजेसाठी शिक्षण विभागाकडे रीतसर अर्ज दाखल केला का, त्यांना शिक्षण विभागाने परवानगी दिली होती का, असा सवाल नगरसेवक शशी चोपडे यांनी उपस्थित केला आहे.

महापौर साहेब चाललंय काय?शिक्षण विभागाचा कारभार लयास गेला असून, अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. शिक्षणाधिकार्‍यांना जाब विचारण्यापेक्षा त्यांना पाठीशी घालण्यासाठी काहींनी थेट महापौरांपर्यंत ‘लॉबिंग’सुरू केल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ सुरू असल्यामुळे महापौर साहेब, मनपात हे चाललंय तरी काय, असे विचारण्याची वेळ आली आहे. 

मुख्याध्यापक, शिक्षकांच्या मनमानीमुळे उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय असल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले. प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यास आम्हाला निर्णय घ्यावा लागेल.- वैशाली शेळके, उपमहापौर 

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक