वरूर जऊळका परिसरात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:18 IST2021-04-15T04:18:16+5:302021-04-15T04:18:16+5:30

वरूर जवूळका: अकोट तालुक्यातील वरूर जऊळकासह परिसरात लोतखेड, खापरवाडी आदी गावांमध्ये बुधवार, दि.१४ एप्रिल रोजी सायंकाळी एक तास वादळ ...

Untimely rain in Varur Jaulka area | वरूर जऊळका परिसरात अवकाळी पाऊस

वरूर जऊळका परिसरात अवकाळी पाऊस

वरूर जवूळका: अकोट तालुक्यातील वरूर जऊळकासह परिसरात लोतखेड, खापरवाडी आदी गावांमध्ये बुधवार, दि.१४ एप्रिल रोजी सायंकाळी एक तास वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

-------------------------------------------

विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त

वरुर जऊळका: सावरा विद्युत फिडर अंतर्गत येणाऱ्या वरूर जऊळका परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. परिसरातील लोतखेड, खापरवाडी आदी खारपाणपट्यातील गावांमध्येही बुधवारी वीज पुरवठा खंडित झाला होता. याबाबत तक्रार करूनही दखल घेतल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

----------------------------------

चिखलगाव येथे भीम जयंती साधेपणाने साजरी

चिखलगाव: येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. सकाळी बौद्ध विहारात वंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात कोविड-१९ च्या नियमांचे पालन करण्यात आले.

-------------------------------------

माझोड-वाडेगाव रस्त्यावर अपघातांमध्ये वाढ

वाडेगाव: माझोड-वाडेगाव रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, मंळवारी ट्रॅक्टर उलटल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

Web Title: Untimely rain in Varur Jaulka area