शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

अकोटात शांतता समिती सदस्य यादीवरून अशांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 18:01 IST

अकोट शहरात अंतर्गत समाजातील विविध घटकांत ही यादी अशांतता धुमसविण्यास कारणीभूत ठरत आहे.

- विजय शिंदे लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: अकोट शहर पोलिसांनी नव्याने तयार केलेल्या शांतता समिती यादीत अनेक वर्षांपासून शांतता प्रस्थापित करण्यास योगदान असलेल्या सक्रिय समाजदूताना निष्क्रिय ठरविण्यात आले आहे. या यादीवरून समाजातील महत्त्वाच्या घटकांत अंतर्गत कलह सुरु झाला आहे. एकीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर हे शांतता व जातीय सलोखा वृद्धिंगत व्हावा, याकरिता ‘सर्व धर्मांची शिकवण एकच’, हा उपक्रम स्वत: राबवित असताना समाजातील शांततेकरिता योग्यता असलेल्यांना डावलण्यात आल्याने अकोट शहरात अंतर्गत समाजातील विविध घटकांत ही यादी अशांतता धुमसविण्यास कारणीभूत ठरत आहे.कायदा व सुव्यवस्था टिकवून राहण्यासाठी समाजात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी शांतता समिती सदस्यांची पोलीस स्टेशन स्तरावर निवड करण्यात येते आहे. धार्मिक उत्सव, सण, मिरवणुका, दंगली आदी संवेदनशील काळात शांतता टिकवण्यासाठी समाजातील विविध क्षेत्र व जाती-धर्माच्या लोकांचा या शांतता समितीमध्ये समावेश करण्यात येतो.यावर्षी नव्यानेच अकोट शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता समितीची यादी तयार करण्यात आली. जिविशाच्या २१ आॅगस्टच्या पत्राचा संदर्भ देत तातडीने दोन दिवसांतच नव्याने सदस्यांची निवड करीत ही यादी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना २४ आॅगस्ट रोजी पाठविण्यात आली. नाव, पत्ता, मोबाइल नंबरसह २६ जणांचा समावेश या समिती यादीत करण्यात आला आहे; परंतु या शांतता समिती निवड यादीत अनेकांना डावलण्यात आल्याने समाजातील विविध घटकांत नाराजीचा सूर उमटला आहे. अनेक वर्षांपासून शांतता प्रस्थापित करण्यासाठी अहोरात्र काम करणारे अनेक प्रतिष्ठित व्यक्ती तथा राजकीय ,संघटनाचे पदाधिकारी यांना डावण्यात आले आहे. ज्या लोकांचा आपापल्या समाजात मानसन्मान आहे, ज्यांचे म्हटल्यावर समाजात शांतता निर्माण होण्यासाठी पोलिसांना मदत केली, अशा अनेक जणांची समितीमधून सुट्टी करण्यात आली. शांतता समितीत स्थानिक पोलिसांची वरिष्ठांसमोर खुशमस्करी करण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात; परंतु हे लोक कायदा व सुव्यवस्था काळात रस्त्यावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिसून येत नाही, अशा गंभीर स्थितीत पोलिसांचे हातात हात घालून काम करणारे अनेक शांतीदूतांना या समितीमधून हद्दपार करण्यात आल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या डोळ्यात धूळ फेक करणारी कागदोपत्री यादीवरून नाराजीचा सूर उमटत आहे. शांतता समिती ही लोकांना खुश करण्यासाठी नव्हे तर शांतता प्रस्थापित करण्यासाठी असणे गरजेचे आहे. त्यामुळे ही यादी कोणाच्या सांगण्यावरून तयार करण्यात आली! वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांना का डावलण्यात आले. यादीत सदस्यांची निवड करताना राजकीय हस्तक्षेप झाला का? कोणाच्या दबावाखाली ही यादी तयार करण्यात आली का, समिती सदस्य निवडीकरिता कोणते निकष लावण्यात आले, आदी गंभीर प्रकारांची चौकशी शहरातील शांततेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी करणे गरजेचे झाले आहे.

शांतता समिती सदस्य यादीपोलीस निरीक्षक संतोष महल्ले, आ. प्रकाश भारसाकळे, नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, अ‍ॅड. अतुल सोनखासकर, राजेश नागमते, अ‍ॅड. ब्रिजमोहन गांधी, अ‍ॅड. अंजूम काजी, सुरेश अग्रवाल, दीपक अग्रवाल, अ‍ॅड. मनोज वर्मा, शेख ख्वाजा अ. रशीद, डॉ. प्रमोद चोरे, कदीर शा वजीर शा, जावेद अली मीरसाहेब, मोहम्मद फारूक अब्दुल अकबाणी, मो. नुरज्जमा मो. आदिल, विवेक बोचे, पुरुषोत्तम चौखंडे, सिद्धेश्वर बेराड, रामचंद्र बरेठिया, अश्विन पितांबरवाले, सुभाष तेलगोटे, भरत मनियार, संजय विरवाणी, प्रा. प्रकाश गायकी, कैलास गोंडचर कैलास गोंडचर यांचा समावेश आहे

टॅग्स :akotअकोटPoliceपोलिस