शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

Unlock 1.0: अकोल्यात दिशा व तारखेनुसार दुकाने उघडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 10:34 IST

५ जूनपासून दिशा आणि सम व विषम तारखेनुसार सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे‘मिशन बिगिन अगेन’चा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.जूस असलेली दुकाने सम तारखेत व दुसऱ्या बाजूला असलेली दुकाने विषम तारखेस

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढविण्यात आले आहे. पूर्वीप्रमाणे कन्टेनमेन्ट झोनमध्ये निर्बंध कायम राहतील. उर्वरित शहरात नवीन सवलती असतील. बाजारपेठा सशर्तपणे उघडल्या जाऊ शकतात. ४ जूनपासून हे आदेश लागू होणार असून ३० जूनपर्यंत कायम राहतील. ५ जूनपासून दिशा आणि सम व विषम तारखेनुसार सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी रात्री उशिरा काढलेल्या नवीन आदेशानुसार ५ जूनपासून ‘मिशन बिगिन अगेन’चा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. यामध्ये बाजारपेठेतील रस्त्याच्या एका बाजूस असलेली दुकाने सम तारखेत व दुसऱ्या बाजूला असलेली दुकाने विषम तारखेस सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.यामध्ये काही अटी-शर्ती टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये कपड्याच्या दुकानामध्ये कपडे घालून पाहण्याची परवानगी राहणार नाही. तसेच विकलेला माल अदलाबदल किंवा परत करण्याची परवानगीही राहणार नाही.प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंध कायम! प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तू व इतर आवश्यक सेवाव्यतिरिक्त इतर सेवा प्रतिबंधित क्षेत्रात बंद राहतील, तसेच या क्षेत्रामधून कोणतीही व्यक्ती आत किंवा बाहेर करताना तपासणी केल्याशिवाय सोडता येणार नाही, असे निर्देश आदेशात दिले आहेत.पहिला टप्पा ४ जूनपासूनसायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बगिच्यांमध्ये, खासगी मैदानांवर, सोसायटी तसंच संस्थात्मक मैदानांवर, बगिचे या ठिकाणी सकाळी ५ ते ७ या वेळेत परवानगी. मात्र इन्डोअर स्टेडियम किंवा बंदिस्त ठिकाणी यापैकी कशालाही परवानगी नाही.कोणत्याही प्रकारे एकत्र येऊन व्यायाम, जॉगिंग, सायकलिंग अशा कोणत्याही उपक्रमाला परवानगी नाही.प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ यांना सोशल डिस्टन्सिंंगचे नियम पाळून काम करण्याची परवानगी.गॅरेज तसेच वर्कशॉप यांना अपॉर्इंटमेंट पद्धतीने काम करण्याची परवानगी.सर्व सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के कर्मचारी वर्ग अथवा १५ कर्मचारी यापैकी जे अधिक असेल अशा उपस्थितीत कार्य सुरू करता येईल.

दुसरा टप्पा ५ जूनसर्व मार्केट, दुकाने यांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत परवानगी. मात्र शॉपिंग मॉल आणि मार्केट संकुल यांना सम-विषम पद्धतीने उघडण्यास परवानगी.कपड्यांच्या दुकानांमध्ये ट्रायल रूमची व्यवस्था उपलब्ध असणार नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खरेदी केलेली वस्तू परत घेण्याची व्यवस्था अमलात असणार नाही.सोशल डिस्टन्सिंंगचे नियम पाळले जातील याची जबाबदारी संबंधित दुकानदाराची असेल. त्याकरिता फूट मार्किंगसारखी व्यवस्था करावी.लोकांनी जवळच्या मार्केटमध्ये चालत किंवा सायकलवर जाऊन खरेदी करावी. मोटराईज्ड गाड्यांद्वारे शॉपिंग करण्याला अनुमती नाही.सोशल डिस्टन्सिंंगचे नियम पाळले जात नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यास ते दुकान तात्काळ बंद करण्यात येईल.वाहनांमध्ये खालील पद्धतीने लोकांची ने-आण करता येईल (टॅक्सी - १+२, रिक्षा-१+२, चारचाकी- १+२, दुचाकी- केवळ एका व्यक्तीला जाण्यायेण्याची परवानगी.)तिसरा टप्पा ८ जूनखासगी आॅफिसेस १० टक्के उपस्थितीत सुरू राहू शकतात. सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसंदर्भात माहिती देणे अनिवार्य.या आदेशानुसार परवानगी असलेल्या बाबींना पुन्हा वेगळ्या परवानगीची गरज नाही.

या गोष्टी बंद राहतील?

  • शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास
  • रेल्वेची नियमित वाहतूक
  • सिनेमाघरे, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार आणि आॅडिटोरियम, कार्यक्रमाचे सभागृह हॉल आणि तत्सम ठिकाणे.
  • कोणत्याही स्वरूपाचा सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, अभ्यासविषयक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम
  • विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे
  • सलून, स्पा, ब्युटी पार्लर
  • शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट तसंच अन्य हॉस्पिटॅलिटी केंद्र
  • सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन कोणताही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाही.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजार