Unlock 1.0: अकोल्यात दिशा व तारखेनुसार दुकाने उघडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 10:31 AM2020-06-03T10:31:12+5:302020-06-03T10:34:33+5:30

५ जूनपासून दिशा आणि सम व विषम तारखेनुसार सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Unlock 1.0: Shops will open according to direction and date! | Unlock 1.0: अकोल्यात दिशा व तारखेनुसार दुकाने उघडणार!

Unlock 1.0: अकोल्यात दिशा व तारखेनुसार दुकाने उघडणार!

Next
ठळक मुद्दे‘मिशन बिगिन अगेन’चा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.जूस असलेली दुकाने सम तारखेत व दुसऱ्या बाजूला असलेली दुकाने विषम तारखेस

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढविण्यात आले आहे. पूर्वीप्रमाणे कन्टेनमेन्ट झोनमध्ये निर्बंध कायम राहतील. उर्वरित शहरात नवीन सवलती असतील. बाजारपेठा सशर्तपणे उघडल्या जाऊ शकतात. ४ जूनपासून हे आदेश लागू होणार असून ३० जूनपर्यंत कायम राहतील. ५ जूनपासून दिशा आणि सम व विषम तारखेनुसार सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंगळवारी रात्री उशिरा काढलेल्या नवीन आदेशानुसार ५ जूनपासून ‘मिशन बिगिन अगेन’चा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. यामध्ये बाजारपेठेतील रस्त्याच्या एका बाजूस असलेली दुकाने सम तारखेत व दुसऱ्या बाजूला असलेली दुकाने विषम तारखेस सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
यामध्ये काही अटी-शर्ती टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये कपड्याच्या दुकानामध्ये कपडे घालून पाहण्याची परवानगी राहणार नाही. तसेच विकलेला माल अदलाबदल किंवा परत करण्याची परवानगीही राहणार नाही.

प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंध कायम!
 प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तू व इतर आवश्यक सेवाव्यतिरिक्त इतर सेवा प्रतिबंधित क्षेत्रात बंद राहतील, तसेच या क्षेत्रामधून कोणतीही व्यक्ती आत किंवा बाहेर करताना तपासणी केल्याशिवाय सोडता येणार नाही, असे निर्देश आदेशात दिले आहेत.

पहिला टप्पा ४ जूनपासून
सायकलिंग, जॉगिंग, धावणे, चालणे यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बगिच्यांमध्ये, खासगी मैदानांवर, सोसायटी तसंच संस्थात्मक मैदानांवर, बगिचे या ठिकाणी सकाळी ५ ते ७ या वेळेत परवानगी. मात्र इन्डोअर स्टेडियम किंवा बंदिस्त ठिकाणी यापैकी कशालाही परवानगी नाही.
कोणत्याही प्रकारे एकत्र येऊन व्यायाम, जॉगिंग, सायकलिंग अशा कोणत्याही उपक्रमाला परवानगी नाही.
प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ यांना सोशल डिस्टन्सिंंगचे नियम पाळून काम करण्याची परवानगी.
गॅरेज तसेच वर्कशॉप यांना अपॉर्इंटमेंट पद्धतीने काम करण्याची परवानगी.
सर्व सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के कर्मचारी वर्ग अथवा १५ कर्मचारी यापैकी जे अधिक असेल अशा उपस्थितीत कार्य सुरू करता येईल.


दुसरा टप्पा ५ जून
सर्व मार्केट, दुकाने यांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत परवानगी. मात्र शॉपिंग मॉल आणि मार्केट संकुल यांना सम-विषम पद्धतीने उघडण्यास परवानगी.
कपड्यांच्या दुकानांमध्ये ट्रायल रूमची व्यवस्था उपलब्ध असणार नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खरेदी केलेली वस्तू परत घेण्याची व्यवस्था अमलात असणार नाही.
सोशल डिस्टन्सिंंगचे नियम पाळले जातील याची जबाबदारी संबंधित दुकानदाराची असेल. त्याकरिता फूट मार्किंगसारखी व्यवस्था करावी.
लोकांनी जवळच्या मार्केटमध्ये चालत किंवा सायकलवर जाऊन खरेदी करावी. मोटराईज्ड गाड्यांद्वारे शॉपिंग करण्याला अनुमती नाही.
सोशल डिस्टन्सिंंगचे नियम पाळले जात नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यास ते दुकान तात्काळ बंद करण्यात येईल.
वाहनांमध्ये खालील पद्धतीने लोकांची ने-आण करता येईल (टॅक्सी - १+२, रिक्षा-१+२, चारचाकी- १+२, दुचाकी- केवळ एका व्यक्तीला जाण्यायेण्याची परवानगी.)

तिसरा टप्पा ८ जून
खासगी आॅफिसेस १० टक्के उपस्थितीत सुरू राहू शकतात. सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसंदर्भात माहिती देणे अनिवार्य.
या आदेशानुसार परवानगी असलेल्या बाबींना पुन्हा वेगळ्या परवानगीची गरज नाही.

या गोष्टी बंद राहतील?

  • शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास
  • रेल्वेची नियमित वाहतूक
  • सिनेमाघरे, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार आणि आॅडिटोरियम, कार्यक्रमाचे सभागृह हॉल आणि तत्सम ठिकाणे.
  • कोणत्याही स्वरूपाचा सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, अभ्यासविषयक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम
  • विविध धर्मीयांची प्रार्थनास्थळे
  • सलून, स्पा, ब्युटी पार्लर
  • शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट तसंच अन्य हॉस्पिटॅलिटी केंद्र
  • सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन कोणताही कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी नाही.

 

 

Web Title: Unlock 1.0: Shops will open according to direction and date!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.