अज्ञात वाहनाची मोटारसायकलला धडक, महिला ठार

By Admin | Updated: December 25, 2015 03:18 IST2015-12-25T03:18:51+5:302015-12-25T03:18:51+5:30

चिंचखेड फाट्यावरील घटना; एक जण जखमी.

Unknown vehicle hit motorbike, women killed | अज्ञात वाहनाची मोटारसायकलला धडक, महिला ठार

अज्ञात वाहनाची मोटारसायकलला धडक, महिला ठार

कुरूम (जि. अकोला): मधापुरीहून मानाकडे २४ डिसेंबरच्या रात्री ७.३0 वाजता जाणार्‍या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली. या अपघातात सदर महिलेचा पती जखमी झाला आहे. माना येथील रहिवासी असलेले ब्र१ी येथील शाळेवरील मुख्याध्यापक महेंद्र दहीकर हे गुरुवारी रात्री ७.३0 वाजता मधापुरी येथून त्यांची पत्नी दीपज्योती दहीकर हिच्यासोबत मोटारसायकलने राष्ट्रीय महामार्गाने मानाकडे जात होते. यावेळी चिंचखेड फाट्यानजीक त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दीपज्योती दहीकर (४५) या जागीच ठार झाल्या. महेंद्र दहीकर हे किरकोळ जखमी झाले. या घटनेचे वृत्त समजताच माना पोलीस घटनास्थळी पोहोचले. पुढील कार्यवाही माना पोलीस करीत आहेत.

Web Title: Unknown vehicle hit motorbike, women killed