अज्ञात तापाचे थैमान
By Admin | Updated: September 1, 2014 21:49 IST2014-09-01T21:49:19+5:302014-09-01T21:49:19+5:30
अकोला शहरासह ग्रामीण भागात होत असलेला दूषित पाणीपुरवठा व डासांच्या वाढत्या उच्छादामुळे अज्ञात तापाची साथ सुरू आहे.

अज्ञात तापाचे थैमान
अकोला : शहरासह ग्रामीण भागात होत असलेला दूषित पाणीपुरवठा व डासांच्या वाढत्या उच्छादामुळे अज्ञात तापाची साथ सुरू आहे. या साथीच्या आजारांचा प्रकोप झाला असून, सवरेपचार रुग्णालयामध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू असून, खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची प्रचंड गर्दी आहे. यामध्ये डेंग्यू, डेंग्यूसदृश ताप, सर्दी ताप, डोकेदुखी, मलेरिया व डायरियाच्या रुग्णांचे प्रमाण प्रचंड असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या आजाराबाबत नेमके निदान होत नसल्याने डॉक्टरही हतबल झाले आहेत. जिल्हय़ात सध्या व्हायरलचे रुग्ण प्रचंड प्रमाणात आढळून येत आहे. त्यातच ६ महिने ते ५ वर्ष व त्यावरील वयोगटातील बालकांना ह्यसेल्फ लिमिटिंग इन्फेक्शनह्ण होत असल्याचे आढळून आले असून, हा आजार काही कालावधीनंतर आपोआपच बरा होत असल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. वातावरणातील बदल रोगराईस आमंत्रण देत आहे. या वातावरणाने साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली असून, ५ वर्षांआतील बालकांच्या शरीरात इन्फेक्शन होत असल्याचे बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिवसभर ऊन, रात्री गारवा अन् अधून-मधून पावस, या बदलामुळे जिल्हय़ात मलेरिया व डेंग्यूसदृश तापाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयेही रुग्णांनी हाऊसफुल आहेत.