शिवरमध्ये अपघातात अज्ञात व्यक्ती ठार
By Admin | Updated: December 6, 2015 02:20 IST2015-12-06T02:20:13+5:302015-12-06T02:20:13+5:30
रात्री १ वाजताच्या दरम्यानची घटना.

शिवरमध्ये अपघातात अज्ञात व्यक्ती ठार
अकोला: राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील शिवर गावाजवळील अमित हॉटेलसमोर एका अज्ञात व्यक्तीला ट्रकने धडक दिल्याने तो ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री १ वाजताच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवर परिसरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अमित हॉटेलमधून काही वस्तू घेऊन अज्ञात व्यक्ती रस्ता ओलांडून जात असताना ट्रकने त्या व्यक्तीला धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की, सदर व्यक्ती जागीच ठार झाला. या घटनेची नोंद पेट्रोलिंग करणार्या पोलिसांनी घेतली. मृतदेहाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.